आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणुकीच्या भारताच्या अटींवर असहमती; गुंतवणूकदारांना कमी सुरक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मागील वर्षी सुमारे ५० देशांसोबतचे करार रद्द करण्याचा निर्णय भारतासाठी अडचणीचा ठरत आहे. या करारासाठी भारताने नवीन  कराराचा आराखडा तयार केला आहे. मात्र, अनेक देशांनी भारताच्या अटींवर करार करण्यास नकार दिला  आहे. यामुळे कॅनडा, युरोपियन  युनियन आणि इराणसारख्या देशांतून विदेशी गुंतवणूक थांबली आहे.  या देशांतील मीडियानुसार  गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची  इच्छा असली तरी त्यांना  त्यांच्या  गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमीदेखील हवी आहे.  


भारताने तयार केलेला नवीन करार आराखडा ब्राझिल आणि इंडोनेशियासारख्या इतर विकसनशील देशांप्रमाणेच असला तरीदेखील मागील १० महिन्यांपासून याबाबत एकमत झालेे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 


भारताचा नवीन कराराचा आराखडा जुने आणि नवीन गुंतवणूकदार असा भेदभाव करणार असल्याचे युरोपियन कमिशनने म्हटले आहे. जुन्या गुंतवणूकदारांना जुन्या करारानुसार सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीसाठी सुरक्षा मिळत राहील मात्र, नवीन गुंतवणूकदारांच्या बाबतीत असे होणार नाही. कॅनडाने २००४ पासून करार करण्यासाठी भारतासोबत चर्चा करत आहे. तरीही अजून ठोस निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...