आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपॅडच्या प्रेरणेतून दुबईत उभारली इमारत, एकूण खर्च 5.5 हजार कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई -  हे दुबईत उभारण्यात येत असलेल्या २४ मजली हायटेक इमारतीचे ताजे छायाचित्र आहे. या वर्षाअखेरपर्यंत ही इमारत खुली करण्यात येईल. २३१ फ्लॅट्स असलेल्या या इमारतीचा आराखडा अायपॅड आणि आयपॉडच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला आहे. हाँगकाँगचे आर्किटेक्ट जेम्स लॉ यांनी याचे डिझाइन केले आहे. सायबरटेक्चर प्रकल्पांतर्गत २००६ मध्ये बांधकाम सुरू झालेल्या इमारतीला ‘पॅड टॉवर’ नाव देण्यात आले.

 

पूर्णपणे स्मार्ट इमारत

सर्व फ्लॅट्समध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या खिडक्या व दरवाजे आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, घरात डिजिटल प्रवेशाची सुविधा आहे. बाथरूममध्ये बिल्ट इन हेल्थ डिव्हाइस असून जे वजन, रक्तदाब अशा माध्यमांतून आरशावर डाटा दाखवते. बेल वाजताच लाईट रंग बदलतात. यावर सुमारे ५,५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...