आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत रोज 7 लाख पिंप तेलापासून वीजनिर्मिती, हे वाचवण्यासाठी स्वस्त सौर वीज तयार होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धहरन(सौदी अरेबिया)- ३.२ कोटी लोकसंख्येचा सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा(क्रूड ऑइल) निर्यातदार आहे. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे ९ लाख कोटी रुपयांचे क्रूड निर्यात केले. जागतिक क्रूड निर्यातीत हा वाटा २० टक्के आहे. येथील बहुतांश वीज प्रकल्पही इंधन आधारित आहेत. मात्र, लवकरच येथील स्थिती बदलणार आहे. हा देश क्रूडची निर्यात करून सौर ऊर्जा निर्मिती वेगात साधणार आहे. २०१८ मध्ये ४५,००० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना आहे. यामुळे ७ सौर व एक पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन होईल. २०२३ पर्यंत एकूण वीज उत्पादनाच्या १० टक्के वाटा अक्षय्य ऊर्जेचा असावा, असे उद्दिष्ट आहे. गेल्या आठवड्यात ३०० मेगावॅटच्या प्रकल्पासाठी १.२ रुपये प्रति युनिट लावलेली बोली सर्वात कमी आहे.  


सौर ऊर्जेवर भर देण्याचे मुख्य कारण म्हणजे सौदीत जेवढे क्रूडचे उत्पादन होते त्याच्या एक चतुर्थांश वाटा स्वत:साठी खर्च होतो. येथे क्रूडचा वापर वार्षिक ७ टक्क्यांनी वाढत आहे. प्रत्येक पिंपाच्या देशांतर्गत वापरामुळे निर्यातीत ३,६०० रुपये सांकेतिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये येथे दररोज ६.८ लाख पिंप इंधनाचा वापर वीज निर्मितीत झाला. हे भारताच्या प्रतिदिन ९ लाख पिंप क्रूड उत्पादनाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या इंधनाची निर्यात झाल्यास दररोज जवळपास २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. 

 

सौदी अरेबियातील सर्वात मोठा सौर प्रकल्प  

सौदीचा सर्वात मोठा सौर प्रकल्प जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी आर्मकोच्या वाहनतळात आहे. वीज कंपनीला याचा पुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...