आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EPFO : कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल फारच कमी तर सरकार करणार चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा पगार कमी असल्यास सरकार त्याची चौकशी करणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) प्रॉविडंट फंडात होणारे कॉन्ट्रिब्यूशन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

ईपीएफओ यासाठी इस्टॅबलिशमेंट वेज अॅनालिसिस रिपोर्ट तयार केला आहे. ईपीएफओने या रिपोर्टच्या आधारे तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा पगार अतिशय कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या नावासमोर शुन्य वेतन दाखविण्यात आले आहे. 

 

 

ईपीएफओने घेतलाय काय निर्णय?
ईपीएफओचे रिजनल पीएफ कमिशनर-1 अपराजिता जग्गी यांनी सर्व अतिरिक्त पीएफ आयुक्त आणि विभागीय पीएफ कमिशनरसाठी एक सर्कुलर जारी केले आहे. सर्कुलरमध्ये सांगण्यात आले आहे की, जरुरी आहे की एम्‍पलॉयर्सचे इलेक्टॉनिक चलान कमी रिटर्न म्हणजेच ईसीआरमध्ये नॉन कॉन्ट्रिब्यूटरी पीरियडला योग्य पध्दतीने दाखविण्यात यावे. ज्यामुळे नॉन कॉन्ट्रिब्यूटरी पीरियड कॉन्ट्रिब्यूटरी पीरियडमध्ये मोजला जाऊ नये. याशिवाय हे सुनिश्चित करणेही गरजेचे आहे की एम्‍पलॉयर्स विशेषत: कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कमी पगारावर नव्हे तर प्रॉव्हिडंट फंडात फुल वर्किग पीरियडमध्ये कॉन्ट्रिब्यूट करतील.

 

 

ईपीएफओ तयार करणार वेज अॅनालिसिस रिपोर्ट 
सर्कुलरमध्ये म्हटले आहे की, सीएआययू डॅशबोर्डात वेज अॅनालिसिस रिपोर्ट देण्यात येईल. यात झोन आणि विभाग स्तरावर ईपीएफओ अधिकारी आपल्या क्षेत्राचा वेज एनालिसिस रिपोर्ट पाहू शकतील. या आधारावर योग्य ते पाऊल उचलू शकतील. वेज एनालिसिस रिपोर्टमध्ये एका कंपनीचा किंवा इस्टॅबलिशमेंट आणि मेबर्सची एक खास वेज स्लॅब डिटेल असेल. या आधारावर मेंबरच्या डिटेल तपासण्यात येतील. त्यानंतर व्हेज स्लॅबचे व्हेरिफिकेशन करण्यात येईल. 

 

 

पुढे वाचा: 15 कोटीहून कमी आहेत EPFO चे मेंबर 

बातम्या आणखी आहेत...