आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Patanjali, Amul, Flipkart च्या सहाय्याने मुद्रा लोन वाटणार सरकार, 40 कंपन्यांसोबत करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुद्रा लोनसाठी सरकारची मोठी घोषणा. - Divya Marathi
मुद्रा लोनसाठी सरकारची मोठी घोषणा.

नवी दिल्ली- अर्थखात्याने मुद्रा योजनेतंर्गल लहान व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी फ्लिपकार्ट, स्विगी, पतंजली आणि अमूलसह 40 कंपन्यांसोबत करार केला आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत (पीएमएमवाय) कर्ज देण्यासाठी 23 मे रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

कर्ज देण्यासाठी पात्र व्यक्तींची करणार निवड
अर्थखात्याचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले की, रोजगार निर्मिती करणाऱ्या 40 कंपन्यांची आम्ही ओळख पटवली आहे. या कंपन्याच आता अशाच लोकांना कर्ज देतील ज्यांना त्याची गरज आहे. यामुळे अशा लोकांपर्यंत पोहचता येईल ज्यांना व्यवसायासाठी खरेच कर्जाची गरज आहे पण त्यांच्यापर्यंत बॅंका पोहचत नाहीत.

 

 

गतवर्षी वाटले 2.53 लाख कोटींचे कर्ज
गतवर्षी सरकारने मुद्रा योजनेतंर्गत 2.53 लाख कोटींचे कर्ज वाटले. तर गत तीन वर्षात 5.73 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गैर कॉर्पोरेट, गैर कृषी लहान आणि सुक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांचे कर्ज देण्यासाठी 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात केली होती.

 

 

कोणत्या कंपन्यांसोबत समझौता
अर्थखात्याने ज्या कंपन्यांसोबत करार केला आहे त्यात मेक माय ट्रिप, झोमॅटो, मेरू कॅब, मुथूट, एडलवाईस, अमेझॉन, ओला, बिग बास्केट, कार ऑन रेंट आणि हबीब सलून याचा समावेश आहे. यासोबत फ्लिपकार्ट, अमेझॉन, उबेर, ओला, ओयो, अमूल, पतंजली आणि झोमॅटो सारख्या कंपन्या रिटेल फ्रॅन्चायसी, ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स/सप्लायर्सला मुद्रा योजनेतंर्गत 10 लाखाचे कर्ज देण्याविषयी विचार करत आहेत.

 

 

मुंबईत होणार सेमिनार
मुंबईत होणाऱ्या सेमिनारमध्ये रोजगार संधी निर्माण करण्याविषयी आणि उद्यम विकासावर लक्ष केंद्रित करण्यावर विचार करण्यात येणार आहे. यामागे नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे निर्माण व्हावेत हा उद्देश आहे. या कार्यक्रमात एसबीआय, आयसीआयसीआय, बॅक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑईल कंपन्या, रेल्वे बोर्डाचे एमडी/सीईओ/सीएफओ रॅंकचे अधिकारी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...