आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकला आतापर्यंतचा सर्वाधिक प्रॉफिट, 63% टक्क्यांनी वाढ, 32500 कोटी रुपये नफा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकने मार्चच्या तिमाहीत 32500 कोटीचा नफा कमावला आहे. - Divya Marathi
फेसबुकने मार्चच्या तिमाहीत 32500 कोटीचा नफा कमावला आहे.

सॅन फ्रान्सिस्‍को- सोशल मीडिया कंपनी फेसबुकला या आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या तिमाही 63 टक्क्याच्या वाढीसह 32,500 कोटी रुपयांचा (4.9 अब्ज डॉलर) फायदा झाला आहे. कंपनीला सर्वाधिक फायदा हा जाहिरातीच्या माध्यमातून झाला आहे. एकूण नफ्यात त्याचे योगदान 49 टक्के आहे.

 

 

शेअरची उसळी
मार्च महिन्यात डेटा लीक प्रकरणामुळे फेसबुकचा शेअर 14 टक्के घसरला होता. पण शानदार तिमाही निकालामुळे त्यात बुधवारी तेजी दिसली. फेसबुकचा शेअर 4.7% तेजीसह 10,876 रुपयांवर पोहचला. रिसर्च फर्म जीबीएच इनसाइट्सचे म्हणणे आहे की, हे कंपनीचे आतापर्यत्तचे सर्वोत्तम निकाल आहेत.

 

 

मजबूत सुरुवात
फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांनी एक वक्तव्य जारी करत म्हटले आहे की, अनेक आव्हानांचा सामना करत आम्ही एका मजबूत स्थितीकडे वाटचाल करत आहोत.

 

 

10,000 लोकांना मिळणार नोकरी
सेफ्टी फीचर्स वाढविण्यासाठी फेसबुक जवळपास 10,000 जणांना नोकरी देणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...