आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप, 10 लाखाच्या दंडाची तरतुद, FSSAI ची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची आणि 10 लाखाच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. फूड सेफ्टी आणि स्टॅडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने फूड सेफ्टी आणि स्टॅडर्ड लॉ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवत ही शिफारस केली आहे.

 

 

कायद्याला 2006 मंजूरी पण....
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर FSSAI ने फूड सेफ्टी अॅण्ड स्‍टॅन्डर्डस अॅक्टमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी एक ड्राफ्ट जारी केला आहे. ज्यात भेसळ केल्यास कडक शिक्षेेची शिफारस करण्यात आली आहे. हे विधेयक 2006 मध्ये मंजूर करण्यात आले पण ते 2011 अधिसूचित करण्यात आले. 

 

 

2 जुलैपर्यंत पाठवू शकता सुचना
FSSAI ने या कायद्यात जवळपास 100 सुधारणाचा प्रस्ताव ठेवला आहे. या मसुद्यावर 2 जुलैपर्यंत सुचना मागविण्यात आल्या आहेत. 

 

 

कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा
मसुद्यात म्हटले आहे की, भेसळ करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होईल. ती वाढवून आजीवनही करण्यात येऊ शकते. दंडही 10 लाख रुपयांहून कमी असणार नाही.

बातम्या आणखी आहेत...