आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या भावात घसरण; चांदीची चमकही झाली कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जागतिक पातळीवर आणि स्थानिक बाजारात मागणीचा अभाव असल्याने सोन्याचा भाव आज घसरला. दिल्लीत सोन्याचा भाव 70 रुपयांना घसरून 32,130 रुपये प्रती दहा ग्रॅमसाठी झाला. तर औद्योगिक मागणी घटल्याने चांदीचा भावही 250 रुपयांनी कमी झाला. चांदी प्रति किलोग्रॅम 40,250 रुपये असा भाव होता.

 

 

काय आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे
डॉलर मजबूत झाल्याने आणि परदेशात, स्थानिक पातळीवर सोन्याला मागणी नसल्याने सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे. न्‍यूयॉर्कमध्ये सोन्याच्या भावात 0.86 टक्के घट झाली. तेथे 303.60 डॉलर प्रति औंस असा सोन्याचा भाव होता तर चांदीचा भाव 0.95 टक्के घसरला, तो 16.14 डॉलर प्रति औंस होता. दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुध्द सोन्याची किंमत 70-70 रुपयाने घटून 32,130 रुपये आणि 31,980 रुपये होती. 

बातम्या आणखी आहेत...