आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने महागले, लग्नसराईमुळे मागणी वाढली, चांदी स्थिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने सोन्याचा भाव पुन्हा वधारला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 110 रुपयांना वाढला आहे. दिल्लीत सोन्याचा दर 32, 320 रुपये प्रति दहा ग्रॅमसाठी झाला आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडस्‍ट्रीयल यूनिट्स आणि क्वाईन मेकर्स यांची मागणी असल्याने चांदीचा दर 40,450 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. 

 

 

हे होते तेजीचे कारण
बुलियन ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. हेच कारण आहे की स्थानिक सोन्या-चांदीचे व्यापारी खरेदी करत आहेत. जागतिक पातळीवर सोने 0.48 टक्क्यांनी वाढून 1,322.60 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहे. 

 

 

दोन दिवसात सोने 240 रुपयांनी झाले होते स्वस्त
दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुध्द सोन्याची किंमत 110 रुपयांनी वाढली आहे. सध्या तेथे प्रति दहा ग्रॅमसाठी 32,320 रुपये आणि 32,170 रुपये दर चालु आहे. मागील दोन दिवसात सोने 240 रुपयांनी स्वस्त झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...