आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 190 रुपयांनी स्वस्त; 32210 रुपयांवर भाव, चांदीतही घसरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जागतिक स्तरावर नसलेली मागणी आणि स्थानिक बाजारातही उठाव नसल्याने सोन्याचा भाव 190 रुपयांनी कोसळला आहे. दिल्लीच्या बाजारात सोन्याची किंमत 32, 210 रुपये प्रती दहा ग्रॅमसाठी आहे. तर चांदीचे भावही कोसळले आहेत. औद्योगिक स्तरावर आणि नाणे बाजारातून मागणी नसल्याने चांदीचा दर 100 रुपयांनी घसरला आहे. चांदीचा भाव आता 40,450 रुपये प्रती किलोग्राम झाला.

 

 

हे आहे मंदीचे कारण 

ट्रेडर्सचे म्हणणे आहे की डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दर कोसळत आहेत. डोमेस्टिक लोकल ज्‍वेलर्स आणि रिटेलर्सकडून मागणी नसल्यानेही किंमती घसरल्या आहेत. जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोने 0.48 टक्के घसरून 1,316.30 डॉलर प्रति औंस वर आले आहे, तर चांदी 0.27 टक्के घसरून 16.47 डॉलर प्रति औंस वर आली आहे.

 

 

- दिल्लीत 99.9 टक्के 99.5 टक्के शुध्द सोन्याचा भाव 190-190 रुपयांनी कोसळून क्रमश: 32,210 रुपये आणि 32,060 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचला.

- काल सोने 50 रुपयांनी घसरले होते.

 

बातम्या आणखी आहेत...