आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली-सरकार लवकरच पेंशन धारंकासाठी मोठी सुखद बातमी देणार आहे. सरकार एम्प्लॉई पेंशन स्कीमच्या अंतर्गत मिळणाऱ्या मूळ राशीत दुप्पट वाढ करण्याचा विचार करत आहे. कर्मचारी भविष्य निधी संगठन म्हणजे ईपीएफओच्या अंतर्गत ईपीएस सब्सक्रायबर्सच्या मासिक पेंशनला दुप्पट करून 2 हजार रुपये केली जाऊ शकते. याचा फायदा जवळपास 40 लाख सबक्रायबर्सना मिळणार आहे. मात्र यामुळे सरकारवर 3000 कोटी रुपयांचा बोझा वाढणार आहे. पुढच्या वर्षी निवडणुकांआधी निर्णय होऊ शकतो.
ईपीएफओ योजनेवर करत आहे काम
एक इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमी नुसार सरकार पेंशन दुप्पट करण्याच्या तयारीत असेल तर ही पेंशनधारकांसाठी खुशखबरच आहे. कॅबिनेट 2014 मध्ये एका वर्षासाठी 1 हजार रुपये मासिक पेंशन धारकांना मंजूरी दिली होती. 2015 मध्ये त्यात वाढ करण्यात आली. सरकार दरवर्षी न्यूनतम पेंशनसाठी 813 कोटी रुपयांचं योगदान देत आहे. आता या नवीन योजनेवर ईपीओएफओ काम करत आहे.
40 लाख सबस्क्रायबर्सना होणार फायदा
ईपीएफ 95 स्कीमच्या अंतर्गत 60 लाख पेंशनर्स आहेत. यामध्ये 40 लाख लोकांना 1500 रुपयांपेक्षा कमी पेंशन मिळणार आहे. यामधील 18 लाख पेंशनर्सना न्यूनतम हजार रुपये पेंशन योजनेंतर्गत फायदा मिळणार नाही. सरकार 3 लाख कोटी पेंशन फंड आणि ईपीएसच्या अंतर्गत 9 हजार करोड रुपये देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.