आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 9 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग 9 दिवसांत पेट्रोल 2.24, डिझेल 2.15 रु. महागले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-२ ६ महिन्यांत पेट्रोलचे दर ३६%, तर डिझेलचे दर ५४ टक्के वाढले
पेट्रोल- डिझेल सलग नवव्या दिवशी महागले. या ९ दिवसांत पेट्रोल २.२४ रुपये आणि डिझेल २.१५ रुपये महागले. तेल कंपन्यांचा नफाही वाढतच चालला आहे. मंगळवारी देशतील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑयलचा तिमाही अहवाल आला. जानेवारी ते मार्च २०१८ कालावधीत कंपनीचा नफा ४०% वाढला. तो ३,७२१ कोटींवरून ५,२१८ कोटींवर गेला.  देशातील तिन्ही सरकारी कंपन्यांचा नफा सुमारे ३३ हजार कोटी रु. आहे. गेल्या २ वर्षांत पेट्रोल २० रुपयांनी महागले आहे. 

 

नफ्याचे कारण: इन्व्हेंट्रीमुळे लाभ. म्हणजे स्वस्तात खरेदी केलेला जुना स्टाॅक जास्त दराने विकल्याने कंपनीला तिमाहीत ३,४४२ कोटींचा फायदा झाला. तो नफ्याच्या ६६ टक्के आहे. 

 

* २०१५-१६ मध्ये पेट्रोलियममधून महसूल २६% व २०१६-१७ मध्ये २५% वाढला. या हिशेबाने २०१७-१८ मध्ये केंद्राचे उत्पन्न ६.५५ लाख कोटींवर जाऊ शकते. 
* मार्च २०१६ मध्ये पेट्रोलचे दर ५६.६१ रुपये प्रतिलिटर होते. हे विद्यमान मोदी सरकारच्या राजवटीतील सर्वात कमी दर होते. यानंतरच्या २६ महिन्यांत पेट्रोल ३६% महागले आहे. या दरम्यान डिझेलही ५४ टक्क्यांनी महाग झालेले आहे.

 

> पेट्रोलियम मंत्र्यांची तेल कंपन्यांसोबत आज होणार बैठक

काँग्रेसच्या ३ मागण्या

 प्रवक्ते पवन खेडा म्हणाले : पेट्रोल-डिझेलला जीएसटीत आणले जावे. अबकारी शुल्कात तत्काळ कपात करावी. भाजप शासित राज्यांनी व्हॅट घटवावा. मोदी सरकारने पेट्रोलवर अबकारी शुल्क २१२% व डिझेलवर ४३३% वाढवले.


भाजपचे उत्तर : अध्यक्ष अमित शहा म्हणाले : निर्धारित सूत्रानुसारच दर वाढले आहेत. तथापि, बुधवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेल कंपन्यांसोबत बैठक घेतील सरकार २-३ दिवसांत तोडगा काढेल, अशी आशा आहे. पंतप्रधानही आपत्कालीन बैठक घेऊ शकतात. 

 

देशातील 4 प्रमुख शहरातील पेट्रोलच्या किंमती

शहर   किंमत (रुपये) 
दिल्‍ली 76.87
 मुंबई  84.70
 कोलकाता 79.53
 चेन्‍नई 79.79

 

देशातील 4 प्रमुख शहरातील डिझेलची किंमत 

शहर   किंमत (रुपयात) 
दिल्‍ली 68.08
 मुंबई  72.48
 कोलकाता  70.63
 चेन्‍नई 71.87
 

 

 

 पुढील स्लाईडवर पहा केंद्राची कमाई ९७% वाढली, तेल कंपन्यांचाही नफा २५०% वाढला, झळ मात्र सर्वसामान्यांना

बातम्या आणखी आहेत...