आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरमध्ये छापले जाणार डिफाॅल्टर्सचे फोटो, अर्थ मंत्रालयाने सरकारी बॅंकांना दिले निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली. जाणूनबुझून कर्ज न फेडणा-या लोकांचे फोटो नावासहित वर्तमानपत्रात छापले जाणार आहेत. सरकारने नुकतेच बँकांना निर्देश दिले आहेत. सरकारने बॅंकाना फोटसोबतच कर्जाचं पूर्ण विवरण देखील छापण्यास सांगितले आहे. अर्थमंत्रालयाने या बाबतीत बॅंकाना पत्र लिहिले आहे. हे पत्र सगळ्या सरकारी बॅंकांना पाठवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या पत्रात म्हटले आहे की सगळ्या बॅंकानीं डिफाॅल्टर्सचं विवरण वर्तमानपत्रात छापण्याधी आपल्या बोर्डाची परवनगी घ्यावी.

 


डिफाॅल्टर्सची संख्या 9 हजारांपेक्षा जास्त 
कर्ज घेतल्यानंतर ते जाणूनबुझून न फेडणा-्यांची संख्या डिसेंबर 2017 मध्ये 9,063 इतकी होती. बॅंका म्हणण्यानुसार ह्या लोकांची कुवलत कर्ज फेडण्याची असते पण ते तसं करत नाहीत. त्यामुळे त्यांना व्हिलफुल डिफाॅल्टर्स म्हटले जाते. लोकसभेतील एक प्रश्नाला लिखित उत्तरात सरकारने सांगितले की अशा प्रकारच्या डिफाल्टर्सकडे बॅंकांचे 1,10,050 कोटी रुपये अडकले आहेत. 

 

सरकारने पासपोर्टचा पुरावा केला आहे अनिवार्य 
सरकारने आधीच 50 कोटींपेक्षा जास्त रकमेच्यासाठी पासपोर्टचा पुरावा अनिवार्य केला आहे. सरकारने सांगितले जर कर्ज घेतल्यानंतर डिफाॅल्टर परदेशात पळून जाण्याच्या तयारीच असेल तर त्याला रोखणे व पकडणे सोपे होईल. सरकार ने बॅंकाना देखील 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांचे पासपोर्टची माहिती 45 दिवसांत देण्याचे आदेश दिले आहेत. 


 
आणखी माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...