आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol price : सरकार अबकारी शुल्कात 2 ते 4 रुपयांची कपात करण्याच्या तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकार अबकारी शुल्कात 2 ते 4 रुपयांची कपात करण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान हे देखील बुधवारी तेल कंपन्यांसोबत चर्चा करणार आहेत. इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना सरकार वाढत्या किंमती रोखण्यास सरकार सांगू शकते. 

 

 

कुठल्याही क्षणी होऊ शकतो निर्णय
अर्थमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीएमओला सगळा डाटा आणि इनपुट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मागील एक आठवड्यापासून अबकारी शुल्क कमी करण्याविषयी चर्चा होत आहे. याबाबत निर्णय होऊ शकतो. डिलरच्या कमिशनबाबतही चर्चा चालू आहे. सरकारने नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 या कालावधीत 9 वेळा अबकारी शुल्कात वाढ केली होती. केवळ एकदा गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कपात केली होती.  

 

 

एक रुपयाच्या कपातीने 140 अब्जाचा बोजा
अधिकाऱ्याने सांगितले की, अबकारी शूल्कात एक रुपयाची कपात केल्यास सरकारवर 130 ते 140 अब्ज रुपयांचा बोजा पडू शकतो. तर 2 रुपयांची कपात केल्यास 260 ते 280 अब्ज रुपयांचे नुकसान सरकारला सहन करावे लागेल. सरकारने 4 रुपयांची कपात केल्यास  520-560 अब्जाचे नुकसान होऊ शकते.

 

10 दिवसात पेट्रोल 2.54 रुपयाने महागले

शहर बुधवार (रुपये/लीटर) 13 मे वाढ (14-23 मे)
दिल्ली 77.17 (आजपर्यंतचा उच्चांक) 74.63 2.54 रुपये
मुंबई 84.99 82.48 2.51 रुपये
कोलकाता 79.83 77.32 2.51 रुपये
चेन्नई 80.11 77.43 2.68 रुपये

10 दिवसात डिझेल 2.41 रुपयांनी महाग

शहर बुधवार(रुपये/लीटर) 13 मे वाढ (14-23 मे)
दिल्ली 68.34 (आजपर्यंतचा उच्चांक) 65.93 2.41 रुपये
मुंबई 72.76 70.20 2.56 रुपये
कोलकाता 70.89 68.63 2.26 रुपये
चेन्नई 72.14 69.56 2.58 रुपये

 

बातम्या आणखी आहेत...