आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावामध्ये जमीन असल्यास सरकार देत आहे 6 लाख रुपये कमावण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्याकडे गावामध्ये जमीन असेल किंवा जमीन भाड्यावर घेऊ शकत असाल तर तुमच्यासाठी बिझनेसची एक उत्तम संधी आहे. केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून रूरल टुरिझम (ग्रामीण पर्यटन)ला प्रमोट करत आहे. तुम्हीसुद्धा सरकारच्या या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा बिझनेस सुरु करू शकता. तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा कोणत्याही ग्रामीण भागात रूरल टुरिझम स्पॉट डेव्हलप करून चांगली कमाई करू शकता. तुम्हाला रूरल टुरिझमचा बिझनेस सुरु करण्याची इच्छा असल्यास सरकार तुमची पूर्ण मदत करेल. आज आम्ही तुम्हाला या विषयी सविस्तर माहिती देत आहोत.


का दिले या प्रोजेक्टला प्राधान्य 
केंद्र सरकार द्वारे संचालित सिडबी ( स्‍मॉल इंडस्‍ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया)नुसार शहरीकरण वाढल्यामुळे लोक आता सुटीचे दिवस वेगळ्या पद्धतीने घालवण्यास इच्छुक आहेत. याच कारणामुळे मागील काही वर्षांपासून ग्रामीण पर्यटनाचा स्कोप वाढत आहे. विदेशी लोकांनाही भारताच्या ग्रामीण संस्कृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे सरकारने ग्रामीण पर्यटन उपक्रमाला जास्त प्राधान्य दिले आहे.


सरकार कशाप्रकारे करत आहे सपोर्ट
सिडबीनुसार, केंद्र सरकार ग्रामीण पर्यटनाला सपोर्ट करत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 153 ग्रामीण पर्यटन प्रोजेक्टला सपोर्ट केले आहे. एवढेच नाही तर यूएनडीपीसुद्धा 36 रूरल लोकेशनला रूरल टुरिझमच्या धर्तीवर डेव्हलप करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. ग्रामीण पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी केर्द्र सरकार गावाच्या जवळपास असलेले इंफ्रास्‍ट्रक्‍चर डेव्हलप करत आहे. उदा. रोड, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ऍडव्हेंचर किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंट, रिसेप्शन आणि अकमो‍डेशन इ. गोष्टींची व्यवस्था करत आहे. यासाठी तुम्हाला स्टेट लेव्हलच्या टुरिझम एजन्सीच्या संपर्कात राहावे लागेल.


पुढे वाचा, किती राहील प्रोजेक्ट कॉस्ट...

बातम्या आणखी आहेत...