आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- केंद्र सरकारने 2000 रुपयांची नोट बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेत 10 रुपयांची नवीन प्लास्टिकच्या नोटा प्रायोगिक तत्वावर पाच शहरात चालवल्या जाणार आहेत. सरकारने शुक्रवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. स्टेट फायनांस मिनिस्टर पी. राधाकृष्ण यांनी लिखित उत्तरामध्ये सांगितले की सरकारचा 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा कोणताही हेतू नाही तसेच भविष्यात ही नोट बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
या पाच शहरांत चालवली जाईल प्लास्टिकची नोट
राधाकृष्ण यांनी प्लास्टिक करंसी सुरु करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की याबाबतीत निर्णय घेतला गेला आहे. ट्रायल म्हणून 10 रुपयांच्या नवीन नोटा लवकर कोचीन म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वरमध्ये चालू केल्या जातील. त्यांनी सांगितले की या नोटा इंडियन प्रेसमध्येच छापल्या जातील.
दोन हजाराची नोट बंद होण्याची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 नोव्हेंबर 2016 ला झालेल्या भाषणानंतर देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते की काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या नंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या, पण त्यानंतर देखील सरकार परत ब्लॅकमनीवर अंकुश ठेवण्यासाठी 2 हजाराची नोट बंद करणार असल्याची चर्चा देशभरात सुरू झाली होती, पण आता सरकारने यावर स्पष्टिकरण दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.