आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील शेतकरी आॅस्ट्रेलियात बनले करोडपती, तुम्हाला देखील आहे संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. देशभरात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनांची चर्चा सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जवळजवळ 40 हजार शेतक-यांचा मोर्चा पोहचल्यानंतर शेतक-यांना न्याय कोण देणार हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनांचा आरोप आहे कि शेतक-्यांचा नेहमी विश्वासघात झालेला आहे. भारतात शेतकरी असणं एक शापच आहे असं मानलं जातं. पण नेमकं याच्या उलट शेतक-्यांची एक वेगळीच कहाणी आहे. यात भारतातील शहरांतील लोक आपल्या जागा विकून दुस-या देशात शेकडो एकर शेती खरेदी करत आहेत. यात सगळ्यात आघाडीवर पंजाबमधील शेतकरी आहेत. 


हे लोक पंजाबमधील आपले छोटे-छोटे प्लाॅट विकून आॅस्ट्रेलियामध्ये लॅंड लाॅर्ड बनले आहेत. त्यांच्या शेतात आता लहान-मोठे ट्रॅक्टर नाही तर सॅटेलाइटवर चालणा-या मशीन्स काम करतात. किटकनाशकांची फवारणी देखील हाताने चालवल्या जाणा-या मशीन्स एेवजी हेलिकाॅप्टरने होते. जर तुमच्याजवळ गुंतवणुकीसाठी योग्य रक्कम असेल आणि शेतीसाठी जमीन खरेदी करण्याची इच्छा आहे तर आॅस्ट्रेलियातील जमीन तुमची वाट बघतेय. तर चला आम्ही तुम्हाला आॅस्ट्रेलियातील शेतकरी बनण्याचा प्रवास कसा पूर्ण करायचा याबद्दल सांगणार आहोत.......

 


आॅस्ट्रेलियात  शेतीयोग्य 80 टक्के जमीन वापरात नाही 

 

-आॅस्ट्रेलियाचं क्षेत्रफळ भारतापेक्षा अडीच पट जास्त आहे आणि लोकसंख्या भारताच्या केवळ सात टक्के आहे. 
-आॅस्ट्रेलियामध्ये जवजवळ 80 % शेतीची जमीन उपयोगात नाही आणि शेती करण्यासाठी शेतकरी कमी आहेत.
-अशातच आॅस्ट्रेलियन सरकारची इच्छा आहे की एवढ्या मोठ्या जमीनीचा उपयोग शेतीसाठी केला जावा. 
-सरकार तिथं परदेशी शेतक-्यांना जमीन देण्यासाठी उत्सुक आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन देखील करत आहेत. 
-आॅस्ट्रेलियन सरकार परदेशी शेतक-यांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील करुन प्रत्येक सुविधा पुरवत आहे. 

 

पुढे वाचा एक एकरच्या बदल्यात मिळतेय शेकडो एकर जमीन 

बातम्या आणखी आहेत...