आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईलद्वारे जाणून घ्या तुमच्या आधारमध्ये कधी झाला काय बदल, नवी सुविधा सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्हाला कधी वाटले की तुमच्या आधारमध्ये काय बदल झाला हे पाहावे तर आम्ही तुम्हाला एका खास सुविधेची माहिती देत आहोत. युनिक आयडेटिफिकेशन अथॉरि‍टी ऑफ इंडि‍याने (UIDAI) नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डात कधी आणि काय बदल करण्यात आला. तुम्ही मोबाईल किंवा संगणकावरुन याची माहिती घेऊ शकता.

 

 

कसे कराल चेक
यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर www.uidai.gov.in जावे लागेल. येथे आधार अपडेट कॅटेगिरीत सगळ्यात खाली Aadhaar Update History (Beta) देण्यात आले आहे. तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला विचारण्यात येते  की नव्या पेजवर किंवा वेबसाईटवर जाणे तुम्हाला मंजूर आहे का? तुम्ही ओके केल्यावर तुमच्यासमोर नवे पेज येईल.

 

 

येथे पहिल्या कॉलममध्ये आधार नंबर भरावा लागेल. त्याखाली सिक्युरिटी कोड भरावा लागेल. त्यानंतर ओटीपी प्राप्त करण्यासाठी तुम्ही सेंड ओटीपीवर क्लिक करु शकता. तुमच्या मोबाईलवर ओटीपी आल्यावर तुम्ही तो पेजवर एंटर करा. त्यानंतर आधार अपडेटची हिस्ट्री दिसेल. 
  

बातम्या आणखी आहेत...