आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंद होत आहे मोबाईल वॉलेट, काढून घ्या तुमचे पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोबाईल वॉलेट कंपन्यांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा लक्षात घेत टेक महिंद्रा लिमिटेडने आपले मोबाईल वॉलेट बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या मोबाईल वॉलेटमधील पैसे खर्च करावेत किंवा ते परत मिळावेत यासाठी अर्ज करावा. कंपनीने 2015 मध्ये मोबोमनी हे वॉलेट लॉन्च केले होते. 

टेक महिंद्रा लि‍मि‍टेडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून टेक महिंद्रा लिमिटेडला प्रीपेड पेमेंट इंस्टूमेंट, पीपीआय सेवा देण्यात आलेले प्रमाणपत्र कंपनीकडून परत करण्यात येणार आहे. कंपनीने आपला पीपीआय व्यवसाय बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे अर्जही केला आहे.

 

 

पुढे वाचा: काय कराल शिल्लक रकमेचे

बातम्या आणखी आहेत...