आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखात करा Paper Bag बनविण्याचा उद्योग, महिन्याला 70 हजार रुपयांचे उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यात पॉलिथिन बंदीनंतर कागदी पिशव्यांची म्हणजेच पेपर कॅरी बॅगची (Paper carry bags) मागणी चांगलीच वाढली आहे. सरकारने पर्यावरण पुरक धोरण स्वीकारले असल्याने तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तुम्ही पेपर बॅग निर्मितीचा प्रकल्प उभारल्यास तुमचा रोजगाराचा प्रश्न तर सुटेलच पण तुम्हा दुसऱ्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ शकता.

 

 

काय आहे पेपर बॅग निर्मिती प्रकल्प?
कागदी पिशव्या या हाताने बनविल्या जातात. पण आता वाढती मागणी लक्षात घेऊन याच्या मशीनही बाजारात आल्या आहेत. या मशीनने बनलेल्या पेपर कॅरी बॅग आकर्षक असतात. त्यामुळे त्यांना मागणीही चांगली आहे.

 

 

5 लाखात सुरू करा बिझनेस
हा बिझनेस तुम्ही 5 लाखात सुरू करु शकता. कन्सलटंट वेबसाईट एक्‍सपर्ट मार्केटच्या म्हणण्यानुसार, तुम्ही हा बिझनेस सुरु करु शकता. या किंमतीत प्रिंट नसलेली मशीन आणि रॉ मटेरियल येते.

 

 

पेपर बॅग बनविण्याची मशीन
पेपर बॅग मेकिंग मशीनची किंमत 2.5 लाख ते 7 लाखादरम्यान आहे. 3.5 लाखात तुम्ही लहान यूनिट मशीन खरेदी करु शकता. बाजारात यापेक्षा कमी किंमतीच्या मशीनही उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये गरजेचे फीचर नसतात. 

 

 

पेपर मेकिंग मशीन खरेदी करताना घ्या ही काळजी
डबल कलर फ्लॅक्सी प्रिटिंग यूनिट अटॅचमेंट
मेन ड्राईव्हसाठी 3 हार्स पॉवरची मोटार
स्टीरियो डिझाईन रोलर
फ्लॅग फॉर्मिग डाय

 

रॉ मटेरियल

यासाठी तीन प्रकारची सामग्री वापरली जाते. प्रॉडक्शनसाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपयांची गरज पडते.

 

या गोष्टींची असते गरज
सफेद किंवा रंगीत पेपर रोल, प्लॅक्सो कलर आणि पॉलिमर स्टीरियो, यात पेपर रोल 45 ते 50 रुपये प्रति किलोग्रॅम, फ्लेक्सो कलर 200 रुपये लीटर आणि पॉलिमर स्‍टीरियो 2 रुपये प्रती सेंटीमीटरने मिळते.

 

किती जागेची गरज: 300 स्क्वेअर फूट

 

पुढे वाचा: मिळू शकते किती उत्पन्न

बातम्या आणखी आहेत...