आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पंचवीस वर्षांचा अनिल प्रायव्हेट जाॅब करतो. त्याला महिना पगार 30 हजार रुपये मिळतो पण मोठ्या शहरात खर्च जास्त असल्याने तो बचत करु शकत नाही. पुढील काळात अनिलच्या जबाबदा-या वाढणार आहेत त्यामुळे त्याला भविष्याची चिंता आहे. त्याला वयाच्या 40व्या वर्षापर्यंत घर गाडी आणि अन्य गरजा पूर्ण करण्याची चिंता लागली आहे. इनकम कमी असल्याने अनिल रिस्क असणा-या ठिकाणी पैसे गुंतवण्यास तयार नाही. तसेच पैसे बॅंकेत ठेवले तरी म्हणावा तेवढा फायदा होत नाही.
अनिलसारखे भरपूर लोक आहेत, ज्यांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांनी गुंतवणुकीचा योग्य मार्ग सापडत नाही. पण उत्पन्न जरी कमी असले तरी योग्य ठिकाणी रोज पैसे वाचवून पैसे गुंतवले तरी तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता, यासाठी तम्ही अशा स्कीमची निवजड करा त्याची सरकार गाॅरंटी घेत असेल आणि तुमचिया गुंतवणुकीवर रिटर्न देखील व्यवस्थित मिळेल. आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत त्यामध्ये तुम्ही रोज 100 रुपये बचत करुन गुंतवणूक केली तर 15 वर्षात 11 लाख आणि 20 वर्षात 18 लाख रुपये मिळतील.
15 वर्षात 11 लाखांचा फंड
रोज 100 रुपये या हिशोबाने महिन्यात 3000 रुपये होतात, 1 वर्षाची बचत 36000 रुपये होते. तसेच 15 वर्षांची बचत 5.40 लाख रुपये होते. जर तुमच्या गुंतवणुकीवर 8 टक्के दराने कपांउडिंग मिळाले तर 15 वर्षात तुमची गुंतवणुक 10.55 लाख रुपये होईल म्हणजेच रोज शंभर रुपये वाचवले तर तुम्ही 15 वर्षात 11 लाखांचे मालक व्हाल
20 वर्षांत 18 लाखांचा फंड
रोज 100 रुपये या हिशोबाने महिन्यात 3000 रुपये होतात, 1 वर्षाची बचत 36000 रुपये होते. तसेच 20 वर्षांची बचत 7.20 लाख रुपये होते. जर तुमच्या गुंतवणुकीवर 8 टक्के दराने कपांउडिंग मिळाले तर 20 वर्षात तुमची गुंतवणुक 17.80 लाख रुपये होईल म्हणजेच रोज शंभर रुपये वाचवले तर तुम्ही 20 वर्षात 18 लाखांचे मालक व्हाल
पुढे वाचा कोणत्या सरकारी स्कीममध्ये कराल गुंतवणूक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.