आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM CARD: पती-पत्नी नाही वापरू शकत एकमेकांचे ATM, बँकेने दिला 25000 चा झटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनेकदा आपण आपले एटीएम कार्ड पत्नी, पती, मुले आणि जवळच्या मित्रांसोबत शेअर करत असतो. पण कायदेशीरदृष्टया हे चुकीचे आहे. बॅंक म्हणते की तुमचे एटीएम कार्डाचा पिन नंबर हा अहस्तांतरणीय असतो. याचा नेमका अर्थ काय आहे हे बंगळुरुमधील एका दाम्पत्यास 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्यावर लक्षात आले. हे प्रकरण आपण सगळ्यांनीच अभ्यासणे गरजेचे आहे.

 

 

काय आहे प्रकरण
बंगळुरुतील मराठाहल्ली या भागात राहणाऱ्या वंदना यांनी 14 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांच्या पती राजेश यांच्यासोबत ATM कार्ड आणि पिन शेअर केले. त्या काळात वंदना या बाळंतपणाच्या रजेवर होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीस अकाउंटवरुन पैसे काढण्यास पाठवले होते. राजेश यांनी ATM कार्ड स्वाईप केले. पुर्ण प्रोसेस झाल्यावर त्यांना पैसा निघाल्याची पावती मिळाली पण पैसे मशीनमधुन बाहेर आले नाहीत. त्यामुळे राजेश यांनी एसबीआयच्या कॉल सेंटरला फोन करुन या घटनेची माहिती दिली. 

 

 

या घटनेच्या 24 तासानंतरही पैसे परत न आल्याने राजेश यांनी एसबीआयच्या शाखेत जाऊन तक्रार केली. एसबीआयने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. राजेश यांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज बॅंकेला दाखवले. त्यात दिसत होते की मशीनमधुन पैसे नाही निघाले. फुटेज पाहिल्यावर बॅंकेच्या तपास समितीने म्हटले की या फुटेजमध्ये अकाउंट होल्डर वंदना यात दिसत नाहीत. तर त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती पैस काढताना दिसत आहे. बॅंकेने पिनच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे सांगितले.

 

 

या राजेश यांनी ग्राहक मंचाकडे अपील केले. साडेतीन वर्ष ही केस कोर्टात चालली कोर्टाने बँकेचे म्हणणे रास्त मानत नियमाचे उल्लंघन झाल्याचे अधोरेखित केले. वंदना यांनी सेल्फ चेक किंवा याबाबतचे अधिकार पत्र देणे गरजेचे होते.

 

 

एटीएम ग्राहकांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
- एटीएम कार्डाचा क्रमांक कोणाबरोबर शेअर करु नका.
- एटीएममधून पैसे काढताना मशीनकडे लक्ष द्या. अनेकदा मशीनला उपकरण लावून तुमचे कार्ड क्लोन करण्यात येते. अकाउंट होल्डरच्या अनेकदा हे लक्षात येत नाही. कार्ड स्वॅप करण्याच्या जागेवर हे डिव्हाईस लावण्यात येते.
- तुम्ही पैसे काढता तेव्हा दुसरी व्यक्ती एटीएममध्ये नसावी.
- पासवर्ड लक्षात येणार नाही अशा पध्दतीने सांगा.
- कोणताही गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यास पोलिसांना कळवा.
- एटीएममधून पैसे काढल्यावर पावती तेथेच टाकू नका. कॅन्सलचे बटन दाबून पुर्ण प्रक्रिया पुर्ण करा.
- बँकेकडून मोबाईलवर अलर्टची सुविधा घ्या. यामुळे तुम्हाला वेळोवेळी सूचना मिळतील.
- एटीएमचा पासवर्ड गोपनीय ठेवा.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...