आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICICI बँक, चंदा कोचर अमेरिकेच्या रडारवर, भारतीय तपास यंत्रणांची मदत घेण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आता अमेरिकेच्या रडारवर आल्या आहेत. अमेरिकेचे मार्केट रेग्युलेटर एसईसी ( सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन) सुद्धा कोचर आणि आयसीआयसीआय बँकेची बँकेतील अनियमिततेप्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान एसईसीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलण्यास नकार दिला. 

 

 

व्हिडिओकॉन ग्रुप न्यूपॉवर कंपनीत झालेल्या कर्जव्यवहारांबाबत सेबीची नोटीस
चंदा कोचर यांची बँकेतील कथित अनियमितते प्रकरणी भारतीय तपास यंत्रणांनी या आधीच चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतरही कोचर यांच्यावर बँकेचा संपूर्ण विश्वास असल्याचे बँकेच्या बोर्डाने स्पष्ट केले होते. दरम्यान, अमेरिकन मार्केटमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मोठे जाळे असल्याने अमेरिकेच्या एसईसी या यंत्रणेने बँकेतील गैरव्यवहार प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. एसईसीने या प्रकरणात लक्ष घातले असून याप्रकरणी एसईसी सेबीकडून अधिक माहिती घेण्याची शक्यता आहे. 

 

 

बँकेतील कथित अनियमिततेप्रकरणी सेबीने कोचर यांना आधीच कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. ICICI बँक व व्हिडिओकॉन ग्रुप तसेच न्यूपॉवर कंपनीत झालेल्या कर्जव्यवहारांबाबत ही नोटीस आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे न्यूपॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...