आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM कार्डाचे हे फायदे तुम्हाला आहेत का माहिती, तुम्हाला मिळू शकतात 2 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुमच्याकडे रूपे एटीएम कार्ड असेल तर ते केवळ पैसे काढण्यासाठी उपयोगी असल्याचा तुमचा समज असेल. पण या एटीएम कार्डाचे आणखीही काही फायदे आहेत. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की रूपे कार्डाचे आणखी काय काय फायदे आहेत. प्रत्येकाकडे स्वत:चे बॅंकेचे खाते असावे, असे सरकारचे धोरण आहे. यासाठी जन-धन अंतर्गत अनेक बँक खाती उघडण्यात आली. या माध्यमातून अनेकांपर्यंत रूपे एटीएम कार्ड पोहचले. या रूपे कार्डाचा वापर व्हावा आणि लोक याबाबत जागरुक व्हावेत यासाठी सरकारने या कार्डाचे अनेक फायदे लोकांना देण्याचा निर्णय घेतला.

 

 

असा मिळेल 2 लाखाच्या विम्याचा फायदा?
- मोदी सरकारने रूपे कार्ड धारकांसाठी रूपे विमा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत ज्या खाते धारकांकडे प्रिमियम रूपे कार्ड आहे त्यांना 2 लाखांचा विमा देण्यात येणार आहे. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्कही आकारण्यात येणार नाही.

 

 

कसा मिळेल एक लाखाचा विमा?
जर तुमच्याकडे नॉन प्रिमियम रूपे कार्ड आहे तर रूपे विमा कार्यक्रमातंर्गत तुमचा एक लाख रुपयांचा विमा होईल. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

 

 

कशा पध्दतीचा असेल विमा?
- हा अपघात विमा असेल. जर तुमचा अपघाती मृत्यू झाला अथवा तुमच्या शरिराचा एखादा अवयव निकामी झाला तर तुम्हाला 1 ते 2 लाखादरम्यानची रक्कम मिळेल. नैसर्गिक मृत्यू झाल्यास तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

 

 

कोणत्या कंपनीचा असेल हा विमा?
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत याबाबत एक करार केला आहे. या करारअंतर्गत तुम्हाला न्यू इंडिया कंपनीचा विमा मिळेल.

 

 

पुढे वाचा: किती दिवसात करावा लागेल क्लेम?

बातम्या आणखी आहेत...