आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In The Silicon Valley, The Eleventh Degree Graduate Study Of Musk And Zuckerberg

मस्क व झुकेरबर्ग घडताहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये, अकरावीत पदवीस्तराचा अभ्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन जोस(कॅलिफाेर्निया) - सिलिकॉन व्हॅलीतील एक शाळा भविष्यातील झुकेरबर्ग व मस्क घडवण्याच्या तयारीत गुंतली आहे. येथील ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराचा आणखी कठीण अभ्यासक्रम तयार केला आहे. उद्यमशीलतेचे गुण विकसित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. बेसिस इंडिपेंडंट सिलिकॉन व्हॅली(बीआयएसव्ही) स्कूलची संकल्पना अमेरिकी दांपत्य मायकेल व ओल्गा ब्लॉक यांची आहे. २०१८ च्या राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी शाळेचे २१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना २०० कोटींची शिष्यवृत्ती मिळेल.  

 

जगातील बड्या देशांतील विद्यार्थ्यांपेक्षा बेसिस स्कूलच्या विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी  

या शाळेच्या विद्यार्थ्यांनी २०१६ मध्ये “प्रोग्राम ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’(पीआयएसए)मध्ये चीन, कोरिया व सिंगापूरच्या मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली होती. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या चाचणीत ७२ देशांतील १५ वर्षांपर्यंतची मुले सहभागी होतात.  

 

मुले प्रोग्राम शिकवण्यावर भर देतात

केवळ तंत्रज्ञानात दक्ष असणे यशाचे मानक नाही. मुलांनी आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडावे, अशी आमची अपेक्षा असते. त्यांनी प्रेक्षक नव्हे तर प्रतिभावंत बनावे.   

- टॉबी वॉकर, बीआयएसव्हीचे प्रमुख  

बातम्या आणखी आहेत...