आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे तुम्हाला Petrol मिळू शकते चक्क 22 रुपयांनी स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. गेल्या 14 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. वाढत्या इंधनदरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, भारतातील एका राज्यातील नागरिकांना पेट्रोल-डिझेल तब्बल 20 ते 22 रुपये स्वस्त मिळत आहे. 

 

 

दिल्लीपासून 1,897 किमी दूर असलेल्या आसाम राज्यातील बक्सा जिल्ह्यात     राहणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीचा कुठलाही त्रास होत नाही. कारण, या नागरिकांना दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या दरापेक्षा 20 ते 22 रुपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळत आहे.

 

 

 

बक्साच्या सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांच्या गाड्या जवळपास दररोज भूतानच्या सॅमड्रप जोंगखार येथे पोहोचतात आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. नॅशनल हायवे 127 ई च्या मार्गावरुन शेकडो नागरिक भूतानमध्ये जातात आणि त्या ठिकाणी पेट्रोल-डिझेल 20 ते 22 रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळेच बक्साच्या सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीमुळे कुठलाही त्रास होत नाही.

 

 

आसाममध्ये पेट्रोलचा दर 76 रुपये प्रति लिटर आहे तर, भूटानमध्ये 52 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच बक्सापासून अर्धा किमी दूर गेल्यावर नागरिकांना स्वस्त पेट्रोल मिळते कारण या ठिकाणी दुसरा देश आहे. विशेष म्हणजे भारतच भूतानला हे पेट्रोल पाठवते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या भुतानला हे पेट्रोल पाठवतात.

 

हेही वाचा:  

या शहरांमध्ये मिळत आहे स्वस्त Petrol, तुम्हीही घेऊ शकता फायदा

Petrol Price : सलग 14 व्या दिवशी पेट्रोलची दरवाढ, Petrol 15 पैशांनी तर 17 पैशांनी महाग

 

 

 

बातम्या आणखी आहेत...