आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 8.4 टक्के वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- औद्योगिक उत्पादनात (आयआयपी) नोव्हेंबर महिन्यात मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. मागील १७ महिन्यांच्या उच्चांकावर जात ८.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये आयआयपी २.२ टक्क्यांवर होता, जी या मागील तीन महिन्यांची  नीचांकी पातळी होती. सप्टेंबर महिन्यातील आयआयपी ४.१४ टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे.  


उत्पादन क्षेत्रातील वाढ नोव्हेंबर महिन्यात २.५ टक्क्यांनी वाढून १०.२ टक्के राहिली. नोव्हेंबर महिन्यात खाण क्षेत्रातील वाढदेखील ०.२ टक्क्यांच्या वाढीसह १.१ टक्के नोंदवण्यात आली. इलेक्ट्रिसिटी क्षेत्रातील वाढ ३.२ टक्क्यांनी वाढून ३.९ टक्के राहिली. गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील वाढ ६.८ टक्क्यांच्या वाढीसह ९.४ टक्के नोंदवण्यात आली. इन्फ्रा आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील वाढ १३.५ टक्के नोंदवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...