आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीठ विकून उभा केला 4 हजार कोटी रुपयांचा ब्रँड, आता रामदेवबाबांना देणार टक्‍कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केवळ पीठ विकून कोणी हजारो कोटी रुपयांचा ब्रँड निर्माण केला, यावर तुम्‍ही विश्‍वास ठेवाल का? मात्र हे करून दाखवले आहे देशातील दिग्‍गज एफएमसीजी कंपनी आयटीसीने. या कंपनीचे आशीर्वाद पीठ हे आता 4 हजार कोटींचे ब्रँड बनले आहे.


दुध-तूपाच्‍याही धंद्यात उतरणार कंपनी
आशीर्वादला मिळालेल्‍या यशानंतर कंपनीमध्‍ये प्रचंड उत्‍साह असून या ब्रँडच्‍या नावाखालीच इतर उत्‍पादने आणण्‍याचाही कंपनी विचार करत आहे. यामध्‍ये दूध, तूप, मसाले, इंस्‍टंट मिक्‍स, रेडी मील यांचा समावेश आहे. यातील अनेक ब्रँडशी टक्‍कर रामदेव बाबांच्‍या प्रॉडक्‍ट्सशी होणार आहे.


आशीर्वाद बनले देशातील नंबर 1 पॅक्‍ड पीठ
आयटीसीचे डिव्हिजनल चीफ एक्‍सीक्‍युटीव्‍ह हेमंत मालिक यांनी सांगितले, '4000 कोटी रुपयांच्‍या टर्नओव्‍हरसोबत आशीर्वाद हा देशातील नंबर वन ब्रँडेड पीठ बनले आहे. मागील अनेक वर्षांपासून 16-17 टक्‍क्‍यांनी यामध्‍ये वाढ होत आहे. ही ग्रोथ पुढेही अशीच चालू राहिल.'
मलिक यांनी सांगितले, 'भारतात ब्रँडेड व्‍हीट फ्लोर मार्केट वेगाने वाढत आहे. जवळपास 60 टक्‍के कुटुंब पीठ खरेदी करतात.  25 टक्‍के कुटुंब खुले पीठ तर 15 टक्‍के कुटुंब पॅक्‍ड पीठ खरेदी करतात.' यामध्ये आमचा 28 टक्‍के वाटा आहे, असा दावा त्‍यांनी यावेळी केला.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा,  32 देशांत आशीर्वाद पीठ होते एक्‍सपोर्ट...

 

बातम्या आणखी आहेत...