आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मार्चपर्यंत LICच्या या पाॅलिसीत करा गुंतवणूक, मिळेल दुप्पट फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. काही दिवसांतच नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. लोक 31 मार्चपुर्वी टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणुकीची गडबड करु लागले आहेत, पण जर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली तर नंतर खुप मोठं नुकसान होऊ शकतं. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)ने एक अशी पाॅलिसी जारी केली आहे ज्यात गुतंवणूक करुन दुप्पट फायदा मिळवता येऊ शकतो. या पाॅलिसीमुळे विम्याचा लाभ देखील मिळेल आणि इनकम टॅक्ससुद्धा वाचेल. या पाॅलिसीत पैसे मात्र एकदाच गुंतवावे लागतील.

 

कोणती आहे पाॅलिसी

LIC ने जीवन उत्‍कर्ष नावाचा सिंगल प्रिमियम प्लॅन जारी केला आहे. ही पाॅलिसी 12 वर्षा मॅच्युअर होते. बारा वर्षांनतर पूर्ण लाभासहित पैसे परत मिळतात. ही पाॅलिसी कमीत कमी 6 वर्षे वयाच्या मुलासाठी तसेच जास्तीत जास्त 47 वर्षांपर्यच्या व्यक्तीसाठी घेतली जाऊ शकते. 


पाॅलिसीच्या बदल्यात घेऊ शकता लोन 

जर एख्याद्याला पैशांची गरज असेल आणि पाॅलिसी पण बंद करायची नसेल तर त्याची व्यवस्था देखील एलआयसी ने केली आहे. LIC या पाॅलिसीवर लोन देखील देईल, पण हे लोन पहिल्या तीन महिन्यांत मिळणार नाही. तीन महिन्यांनंतर तुम्ही पूर्ण पाॅलिसी टर्म मध्ये कधीही लोन घेऊ शकता. 


फ्रि लुक पिरिअडचा पण मिळेल लाभ 

जर एखाद्याला वाटत असेल की त्याने चुकीची पाॅलिसी निवडली आहे तो ती व्यक्ती 15 दिवसांच्या फ्रि लूक पिरिअडमध्ये बंद करु शकते. हे 15 दिवस पाॅलिसी सुरु केल्यानंतरचे ग्राह्य धरले जातात. जर एखाद्याला पाॅलिसी बंद करायची असेल तर त्यासाठी योग्य कारण असावे लागते.  


पुढे वाचा 25व्या वर्षी फायद्याचं गणित 

 
 

बातम्या आणखी आहेत...