आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल बाळगण्यापासून होणार सुटका; jio कडून \'एव्हरीव्हेअर कनेक्‍ट\' सेवेची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतात सर्वप्रथम जिओकडून "ऍपल वॉच सीरिज 3' ची घोषणा करण्यात आली आहे. "ऍपल वॉच सीरिज 3'मध्ये बिल्ट-इन सेल्युलर सुविधा असल्याने ग्राहकांची मोबाईल बाळगण्यापासून सुटका होणार आहे. "ऍपल वॉच सीरिज 3'चे पूर्ण क्षमतेने फायदे ग्राहकांना मिळावेत यासाठी जिओकडून "जिओ एव्हरीव्हेअर कनेक्‍ट' सेवेची घोषणा करण्यात आली आहे.

 


"जिओ एव्हरीव्हेअर कनेक्‍ट'अंतर्गत जिओ ग्राहक एकच क्रमांक आयफोन आणि "ऍपल वॉच सीरिज 3'साठी वापरु शकेल. प्रथमच जिओ ग्राहक 'ऍपल वॉच सीरिज 3' वापरणार असून, त्यांना कॉल करण्यासाठी तसेच, इंटरनेट व ऍप्स वापरण्यासाठी मोबाईल जवळ ठेवण्याची गरज नाही. या सेवेसाठी जिओ अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. जिओची सवोत्कृष्ट सेवा एकच क्रमांकाची दोन उपकरणांवर (आयफोन आणि ऍपल वॉच) मिळेल. एकाच सबस्क्रिप्शनच्या दरात ही सेवा मिळणार आहे. आधी नोंदणी केलेल्या ग्राहकांना पहिल्याच दिवशी डिलिव्हरी देण्यात येणार आहे. 

 

 

"ऍपल वॉच सीरिज 3' सेल्युलरची उपलब्धता : ग्राहकांना 4 मेपासून www.Jio.com, रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअर येथे आगाऊ नोंदणी करता येईल. हे उत्पादन 11 मेपासून उपलब्ध होईल. 

 


आगाऊ नोंदणीचे फायदे : जिओ ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केल्यास त्यांना डिलिव्हरीसाठी प्राधान्य देण्यात येईल (मर्यादित स्टॉक उपलब्ध). याचबरोबर त्यांना वॉच आणि जिओ सेवेच्या (मोबाईल क्रमांक पोर्टेबिलीटसह) होम डिलिव्हरीचा पर्यायही निवडता येईल. जिओच्या ग्राहकांना सेटअपही पाठविण्यात येईल. 

 

 

शुल्क : रिलायन्स जिओ यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. जिओच्या ग्राहकांचा एकच क्रमांक आयफोन आणि वॉच अशा दोन उपकरणांमध्ये वापरला जाणार असला तरी यासाठी अतिरिक्त शुल्क नसेल. जिओ ग्राहकांना सध्याचा प्लॅन न बदलता या सेवेचा फायदा घेता येईल. सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल. 

 

 

जिओवरील "ऍपल वॉच सीरिज 3'चे फायदे 
- वॉचची रचना 4 जी नेटवर्कवर चांगल्या पद्धतीने चालणारी असल्याने जिओच्या 100 टक्के 4 जी नेटवर्कमुळे ग्राहक कायम जोडला जाईल. 
- वॉच 2 जी नेटवर्कवर चालत नाही. भारतात जिओ वगळता अन्य दूरसंचार कंपन्या 2 जी नेटवर्कवर काम करीत आहेत. 
- जिओच्या जगातील सर्वांत मोठ्या मोबाईल डेटा नेटवर्ककडून ऍपल वॉचला अतिशय वेगवान नेटवर्क मिळणार आहे. 
- जिओकडे ऍपल वॉचची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना प्राधान्याने डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशनची सुविधा मिळेल. 
- ग्राहकांना "मायजिओ' ऍप्लिेकशनच्या माध्यमातून कोणत्याहीवेळी त्यांच्या समस्या सोडवता येतील. याचबरोबर प्लॅटिनम केअर सेंटरच्या माध्यमातून प्रशिक्षित कर्मचारीवर्ग ग्राहकांचे प्रश्‍न सोडवत आहे. 
- "ऍपल वॉच सीरिज 3' आणि जिओ एकत्र आल्याने जागतिक पातळीवरील एक सर्वोत्कृष्ट अनुभव ग्राहकाला मिळेल.

 

बातम्या आणखी आहेत...