आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसमधील 100% पैशावर सरकारची गॅरंटी, बँकेत फक्त 1 लाख असतात SAFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की, जनतेचा पैसा बँकेत 100 टक्के सुरक्षित आहेत. पण तुम्ही तुमचा पैसा बँकेत ठेवणे पसंत करत असाल तर तुम्ही एक बाब जाणणे गरजेचे आहे. ती म्हणजे काही परिस्थितीत बँकादेखिल तुमच्या केवळ 1 लाखांपर्यंतच्या रकमेचीच गॅरंटी देतात. पण पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सवर मात्र सरकार पूर्ण पैशांची गॅरंटी देते. 


पोस्ट ऑफिसमध्ये का मिळते 100 टक्के गॅरंटी 

बँक दिवाळखोरीत निघाली तर 
जर बँक दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकांच्या पैशाचे काय होते. अशा परिस्थितीत ग्राहकांची फक्त 1 लाखांपर्यंतची रक्कमच सुरक्षित असते. म्हणजे बँकेत तुमची 1 लाखापेक्षा अधिकची रक्कम असेल तर त्या पैशाची काहीही गॅरंटी नाही. डिपॉझिट इंश्‍युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यांतर्गत एका ग्राहकाला सध्या जास्तीत जास्त 1 लाखांची गॅरंटी मिळते. हा नियम प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला लागू आहे. या 1 लाखात व्यात आणि मुद्दल दोन्हींचा समावेश अशतो. 
 

पोस्ट विभाग पैसे परत करू शकले नाही तर?  
पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या पैशावर सॉवरन गॅरंटी असते. म्हणजे एखाद्या परिस्थितीत पोस्ट विभाग गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकले नाही तर सरकार पैशांची गॅरंटी घेते. म्हणजे कोणत्याही स्थितीत तुमचा पैसा अडकण्याची शक्यता नाही. 

 
बँकेतील पैसा या कामासाठी वापरला जातो 
बँकेत जमा अशलेल्या पैशाचा वापर विविध ठिकाणी होतो. बँका हा पैसा सामान्य नागरिक किंवा उद्योजकांना कर्जरुपात वाटते. कधी बँक तोट्यात आली किंवा कर्जदार दिवाळखोरीत निघाला तर तुमचा पैसा अडकण्याची शक्यता असते. 

 
पौस्टातील पैसा यासाठी वापरला जातो 

पोस्ट ऑफिस स्कीममधील पैसा सरकारी कामांसाठी वापरला जातो. अशा परिस्थितीत या पैशाची गँरटीही सरकार घेत असते. 

 

बातम्या आणखी आहेत...