आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

flipkart ने हेडफोनच्या जागी पाठवली तेलाची बाटली, तक्रारीनंतर मेसेज आला 'वेलकम टू बीजेपी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लिपकार्टने हेडफोन ऐवजी आपल्या ग्राहकास तेलाची बाटली पाठवली होती. - Divya Marathi
फ्लिपकार्टने हेडफोन ऐवजी आपल्या ग्राहकास तेलाची बाटली पाठवली होती.

नवी दिल्ली- ई-कॉमर्स साइट्वर बुक केलेल्या सामानाच्या डिलिव्हरीत गडबड झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशी एक घटना पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे घडली आहे. तेथे एका युवकाने हेडफोन मागविल्यावर त्याला कंपनीने चक्क तेलाची बाटली डिलिव्हर केली. त्याने याबाबतची तक्रार  टोल-फ्री क्रमांकावर केल्यावर त्याला 'वेलकम टू बीजेपी' असा मेसेज आला. 

 

 

फुटबॉल मॅच बघताना त्याच्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ नये यासाठी त्याने फ्लिपकार्टवरुन हा हेडफोन मागवला होता. या युवकाने पाकीट उघडून बघितल्यावर त्याला त्यात हेडफोन ऐवजी तेलाची बाटली आढळून आली. यामुळे संतापलेल्या युवकाने पाकिटावर दिलेल्या 1800 266 1001 या क्रमांकावर संपर्क साधल्यावर एक रिंग वाजून हा फोन बंद झाला. त्यानंतर त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये 'वेलकम टू बीजेपी' असे लिहिलेले होते. या मेसेजमध्ये प्राथमिक सदस्यता क्रमांकही देण्यात आला होता. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही स्टेप्सही सांगण्यात आल्या होत्या. 

 

 

त्यानंतर त्याने या क्रमांकावर आपल्या मित्रांना फोन करण्यास सांगितल्यावर त्यांनाही असाच मेसेज आला. हा नंबर भाजपचा असल्याचे लक्षात आल्यावर त्याने फ्लिपकार्टचा योग्य क्रमांक मिळवून त्यावर संपर्क साधला. त्यानंतर कंपनीने दिलगिरी व्यक्त करत त्यांना हेडफोन पाठवला.

 

 

भाजपने म्हटले, फ्लिपकार्टशी आमचा संबंध नाही
या घटनेनंतर पश्चिम बंगाल, भाजपने आपला फ्लिपकार्टशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगाल, भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आमचा क्रमांक संकेतस्थळावर व फेसबुकसारख्या ठिकाणी आहे. तो कोणीही शेअर करु शकते. त्यामुळे या घटनेसाठी आम्ही जबाबदार नाही. तर फ्लिपकार्टने आपला हा तीन वर्षापुर्वीचा क्रमांक असल्याचे म्हटले आहे. हा काही पाकिटांवर असल्याने असे घडल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

 

 
 
   
 

 

बातम्या आणखी आहेत...