आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडात 8.25 लाखांपर्यंतच्या इनव्हेसमेंटवर नाही द्यावा लागणार CG टॅक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागील वर्षी शेअर मार्केटमध्य गुंतवणूक करून लोकांनी 3.67 लाख कोटी रुपये कमावले. आपण देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन आकर्षक रिर्टन मिळवू शकता. जर तुम्ही म्युच्युअल फंडात 8.25 लाखापर्यंत एकरकमी गुंतवले आणि एक वर्षानंतर ते पैसे काढले तर तुम्हाला यावर लाॅंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार नाही. 
 
केंद्र सरकारने बजेट मध्ये शेअर बाजारातून एक वर्षात एक लाखापेक्षा जास्त मिळणा-या रिटर्नवर 10 टक्के लाॅंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन आकर्षक रिटर्न मिळतील आणि टॅक्स देखील भरावा लागणार नाही याबद्दल सांगणार आहोत......
 
 
एकाचवेळी 8.25 लाख गुंतवल्यास 0 टक्के टॅक्स 
सर्टिफाइड फायनांशियल प्लॅनर तारेश  भाटिया यांनी Moneybhaskar.com शी बोलताना सांगितले कि जर तुम्ही म्युच्युअल फंडात 8.25 लाखापर्यंतची रक्कम एकाचवेळी गुंतवली तर तुमच्या गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्न मिळाला आणि तुम्ही एक वर्षानंतर आपले पैसे काढून घेतले तर तुम्हाला लाॅंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार नाही. 
 
गुंतवलेली रक्कम 8,25,000
अंदाजे रिटर्न  12 %
एक वर्षानंतर रिटर्न 9,24,000
लाॅंग कॅपिटल गेन 99,000
टॅक्‍स रेट 10 %
लॉँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स 0 %

सुचना- हे कॅलक्युलेशन 8.25 लाख एकदाच गुंतवणा-यांसाठी आहे. जर तुम्ही एक वर्षानंतर पैसे काढले तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल टॅक्स द्यावा लागणार नाही. या कॅलकयुलेशनमध्ये गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्न गृहित धरला आहे. रिटर्न जास्त मिळाला तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. 

 
पुढे वाचा 9 लाख रुपये गुंतवणुकीवर भरावा लागेल लाॅंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 
बातम्या आणखी आहेत...