आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • ECN POLI ECNM Infog Last Date Of Registration For Sbi Youth For India Fellowship Is Now 5th June

पदवीधर असल्यास SBI कडून कमवा दरमहा 16 हजार रुपये, रजिस्‍ट्रेशन 5 जूनपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही पदवीधारक असल्यास भारतीय स्टेट बॅंक (SBI) तुम्हाला चांगली संधी देऊ शकतो. बॅंक तुम्हाला या संधीसोबत दरमहा 16,000 रुपये कमविण्याची संधी देत आहे. SBI फाउंडेशनच्या यूथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्रामतंर्गत ही संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी मार्चपासून अर्ज करता येत आहे तर रजिस्ट्रेशनसाठी   5 जून ही अखेरची तारीख आहे. 

 

 

काय आहे SBI यूथ फेलोशिप प्रोग्राम
SBI यूथ फेलोशिप 13 महिन्यांचा कार्यक्रम आहे. या अंतर्गत पदवीधरांना अनुभवी NGO सोबत गावात काम करण्याची संधी प्राप्त होते. याद्वारे एंटरप्रेन्‍योरशिप तुम्ही शिकू शकता शिवाय तुम्हाला प्रोजेक्ट्स लीड करण्याची संधी मिळते. या प्रोजेक्टद्वारे तुम्ही गावातील स्थिती बदलण्यास मदत करु शकता. या यूथ फेलोशिपमध्ये अनेक प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. येथे मुलांना शिकविण्यासमवेत नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याची ट्रेनिंग देण्यात येत आहे. 


सोर्स: https://www.youthforindia.org/
https://www.youthforindia.org/home/web_application_process

 

स्टायपेड
फेलोशिप अंतर्गत 15,000 रुपयांचे स्टायपेड देण्यात येते. याशिवाय 1,000 रुपये प्रतिमाह लोकल ट्रान्सपोर्ट अलाउंस देण्यात येतो. फेलोशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिएडजस्टमेंट अलाउंस म्हणून 30,000 रुपये देण्यात येतात. यात प्रोजेक्ट आणि ट्रेनिंग लोकेशनला येण्या-जाण्याचा खर्च समाविष्ट होता. अधिक माहितीसाठी https://www.youthforindia.org/home/faq जाऊ शकता.

 

पुढे वाचा: हे मिळतील अन्य लाभ

बातम्या आणखी आहेत...