आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉजिस्टिक क्षेत्रात 30 लाख नव्या नोकऱ्या, GST लागू झाल्याचा प्रभाव: रिपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील लॉजिस्टिक क्षेत्रात पुढील चार वर्षात 30 लाख नव्या नोकऱ्या तयार निर्माण होणार आहेत. गुड्स अॅण्ड सर्विसेस टॅक्स (GST) लागू झाल्याने पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढल्याने या नव्या नोकऱ्या निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बाबी टीमलीजच्या एका अहवालात म्हटल्या आहेत.   हा अहवाल  ‘इंडियन लॉजिस्टिक्स रिवॉल्यूशन- बिग बेट, बिग जॉब्स’ या नावाने प्रसिध्द करण्यात आला आहे.

 

 

या 7 उप-क्षेत्रांमध्ये निर्माण होणार नोकऱ्या
अहवालानुसार रस्त्याद्वारे मालवाहतुक, रेल्वेने मालवाहतूक, विमानाने मालवाहतूक, पॅकेजिंग आणि कुरियर यासारख्या 7 उपक्षेत्रांमध्ये पुढील 4 वर्षात 30 लाख नोकऱ्या निर्माण होतील. यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्या 2022 पर्यंत वाढून 1.09 वरुन 1.39 कोटींवर पोहचतील. यातील 18.9 लाख नोकऱ्या रस्त्याद्वारे मालवाहतुक, 40 हजार रेल्वे मालवाहतूक, 4 लाख नोकऱ्या विमान मालवाहतूक आणि जलवाहतूकीच्या क्षेत्रात 4.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील.

 

 

लॉजिस्टिक सेक्टर नव्या फेजमध्ये
टीमलीज सर्विसेसचे को-फाउंडर आणि ईवीपी रितुपर्णो चक्रबोर्ती यांचे म्हणणे आहे की, देशातील लॉजिस्टिक सेक्टर आता नव्या फेजमध्ये पोहचले आहे. या क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढत आहे. त्यात मागील काही दिवसात जीएसटीसह काही बदल झाले आहेत. त्यामुळे एफएमसीजी, मॅन्यूफॅक्चरिंग, ई-कॉमर्स या क्षेत्रात मागणी वाढली आहे. या सेक्टरमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका वाढल्यानेही फायदा मिळाला आहे.

 

 

GST ची मुख्य भूमिका
अहवालात म्हटले आहे की, या क्षेत्रात झालेली 6 लाख कोटी रुपयांची सार्वजनिक गुंतवणूक, या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधांचा दर्जा, जीएसटी लागू होण्याची मुख्य भूमिका या बाबी महत्वपूर्ण आहेत. अहवालानूसार सर्वाधिक संधी या मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि अहमदाबाद येथे उपलब्ध होतील. तर अलहाबाद, अहमदनगर, चेन्नई आणि गुवाहाटी येथे जलमार्गाच्या क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध होतील.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...