आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मार्च आधी 4 दिवस बॅंका राहणार बंद, त्याआधीच पूर्ण करा ही 3 कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्याला माहितच आहे की 31 मार्च हा प्रत्येक आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 31 मार्च आधीच फायनांस, टॅक्स आणि बॅंकिंग संबंधित कामे पूर्ण करावी लागतात. त्याबरोबरच बॅंकांची देखील वर्षभरातील लेखाजोखा पूर्ण करण्याची हीच टाईम फ्रेम असते. यामुळे बॅंकांत 31 मार्चच्या आधी लोकांची गर्दी आढळते. जर तुम्ही देखील 31 मार्चआधी बँकिंगसंबंधी कामे पूर्ण करण्याचा प्लॅन केला असेल तर त्यात तुम्हाला बदल करावा लागेल. 


31 मार्चआधी सलग चार दिवस बॅंका राहणार बंद 
यावेळी 29 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत बॅंका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 ला गुड फ्रायडे, 31 तारखेला शेवटचा शनिवार आणि 1 एप्रिलला रविवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बॅंकांसंबधी कामे आधीच उरकावी लागतील.

 

आधीच करा ही तीन कामे 
चार दिवसांच्या सुट्टीमुळे सामान्य लोकांशी निगडित 3 कामे होऊ शकणार नाहीत, यात एक- तुम्ही बॅंकेत ड्राफ्ट नाही तयार करु शकणार नाही, दोन- तुमचा चेक क्लिअर होणार नाही आणि तीन-तुम्ही कॅश डिपाॅझिट करु शकणार नाही. यामुळे जर तुमचं 3 कामाचं शेड्युल जर 31 मार्चच्या आसपासचं असेल ते त्यात बदल करावा लागेल. 

 

सुट्टीतसुद्धा मिळेल ही सुविधा 
या चार दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्हाला बॅंकिगच्या काही सुविधांचा लाभ मिळत राहिल. तुम्ही एटीएमवरुन पैसे काढू शकाल तसेच आॅनलाईन पैसे पाठवू शकाल। पण तुम्हाला सुट्टीत आरटीजीएसची सुविधा मिळू शकणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...