आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात सोने खरेदीची संधी, जप्त केलेल्या दागिन्यांचा लिलाव करणार मणप्पुरम फायनान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सध्या सोन्याचा भाव 31, 700 रुपयांच्या जवळपास चालू आहे. तुम्ही दागिने खरेदी करताना त्यासोबत मेकिंग चार्जेसही लावले जातात. यामुळे दागिन्यांची किंमत आणखी वाढते. परंतु मणप्पुरम फायनान्स बनवल्या दागिन्यांचा कमी किमतीमध्ये लिलाव करणार आहे. हे दागिने ग्राहकांनी कर्ज घेताना मणप्पुरम फायनान्सकडे गहाण ठेवलेले असतात आणि कर्ज न फेडल्यामुळे कंपनी या दागिन्यांचा लिलाव करते. कंपनी आग्रा, गाजियाबाद, मेरठसहित विविध शहरांमध्ये अशाप्रकारच्या दागिन्यांचा लिलाव करणार आहे. 


केव्हा होणार लिलाव ?
हा लिलाव 30 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित ब्रान्चमध्ये होईल. ज्यांना लिलाव प्रक्रयेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी लिलावाच्या कमीत कमी एक दिवस अगोदर 25000 रुपये किंवा दागिन्यांच्या रिझर्व्ह किमतीच्या 2 टक्क्यांचा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून जमा करावे लागतील. ही रक्कम लिलावात अपयशी ठरलेल्या लोकांना परत दिली जाईल.


पॅन कार्ड दयावे लागेल
गोल्ड ज्वेलरीच्या लिलावात सहभागी होण्यासाठी बोली लावणाऱ्या व्यक्तीजवळ पॅन कार्ड आणि आयडी प्रूफ असणे आवश्यक आहे. कस्टमरने ब्लॅक मनीचा वापर करू नये यासाठी हे आवश्यक आहे. कंपनी लिलावाची तारीख किंवा जागा कोणतीही पूर्व सूचना न देता बदलू शकते आणि याची माहिती कंपनीच्या वेबसाइट आणि लिलाव सेंटरवर मिळेल.


RBI नियमांप्रमाणे होणार लिलाव 
एका गोल्ड कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अशाप्रकारचे लिलाव रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे होते. यासोबतच RBI चा एक अधिकारी लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असतो. डिफॉल्टर ग्राहकाला जाहिरातीच्या माध्यमातून सतर्क केले जाते की त्यांनी त्यांचे दागिने सोडवून नेले नाही तर आम्ही ते लिलावात काढणार. यानंतरही ग्राहक आले नाही तर लिलाव करण्याचा पर्याय निवडावा लागतो.


लिलावापूर्वी दिली जाते नोटीस
गोल्ड फायनान्स कंपनी दागिन्यांचा लिलाव करण्यापूर्वी नोटीस देते. एखाद्या कस्टमरने 12 महिने इएमआय भरले नसतील तर कंपनी त्याला नोटीस पाठवते. त्यानंतरही कस्टमरने कर्ज फेडले नाही तर आरबीआय नियमानुसार कारवाई केली जाते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणत्या शहरांमध्ये होणार आहे लिलाव...

बातम्या आणखी आहेत...