आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या कार्स आणि 'टू व्हिलर्स'चा थर्ड पार्टी प्रिमियम स्वस्त होणार, कपातीचा आहे प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. चालू आर्थिक वर्षात लहान कार आणि 75 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या टू व्हिलर्सचा थर्ड पार्टी इन्शुरन्स स्वस्त होऊ शकतो. इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलेपमेंट आॅथोरिटी आॅफ इंडिया (आयआरडीएआय) ने यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. आयआरडीएआय प्रत्येक वर्षी क्लेम्स आणि इन्शुरन्सचं झालेलं नुकसान यांचा रेशो लक्षात घेऊन प्रिमियम रेट मध्य बदल करत असते. मागील दोन वर्षांत प्रिमियम मध्ये वाढ झाली किंवा त्याला स्थिर ठेवले गेले आहे. 

 

 

मोटार टिपी प्रिमियम किती करण्याचा आहे प्रस्ताव ?


- 1000 सीसी पर्यंतच्या कार साठी 18500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. 2017-18 मध्ये 2,055 रुपये होता.
-1000 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या प्रायव्हेट कार्स साठीच्या प्रिमियममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव नाही. 
-75सीसी पर्यंतच्या बाईक्स साठी 427 रुपये असेल. मागील वर्षी 569 रुपये होता.
-आयआरडीएआय ने मागील आर्थिक वर्षात 1001500 सीसीच्या कार्स साठीचा प्रिमियम 28 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. तसेच 150-300 सीसी कॅटेगरी आणि 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या टू व्हिलर्सच्या बाबतीत देखील हा बदल केला गेला होता. 

 


सुपरबाईक्सचा प्रिमियम होणार दुप्पट


 
-75-150 सीसी सेगमेंटच्या बाईक्ससाठी मोटर टिपी प्रिमियममध्ये बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, पण 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या टू व्हिलर्स साठी 2,323 रुपये प्रिमियम करण्याचा प्रस्ताव आहे. 

 


व्हिटेंज कार्सना दिलासा 

 

-याशिवाय व्हिंटेज अॅंड कलासिक कार क्लब आॅफ इंडिया द्वारा सर्टिफाइड व्हिंटेज कार सेगमेंटमध्ये येणा-या कार्सवर 50 टक्के डिस्काउंट दिला जाईल. 

 


मालवाहतुकीच्या वाहनांचा इन्शुरन्स महागणार 


- याशिवाय 7500-12000 किलोग्रॅम, 12000-20000 किलोग्रॅम, 20000-40000 किलोग्रॅम आणि 40000 किलोग्रॅमपेक्षा जास्त कॅटेगरीजमधील मालवाहतुक करणा-या वाहनांचा (तीन चाकी वाहने सोडून पब्लिक कॅरियर्स) इन्शुरन्स महागणार आहे.
- सध्यातरी रेग्युलेटरीने जीव्हीडब्ल्यू 7500 किलोग्रॅम पेक्षा कमी वाहनांच्या प्रिमियममध्ये कोणताही बदल न करण्याच प्रस्ताव ठेलला आहे. या कॅटेगरीतील प्रायव्हेट सेगमेंटमध्ये किरकोळ वाढ किंवा किंवा कुठलीच वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. 

 

 

तीनचाकी वाहनांचा प्रिमियम होणार कमी 
 
-माल वाहतुक करण्यारी तीनचाकी वाहने आणि मोटराइझ्ड पॅडल सायकल्सच्या मोटर टिपी प्रिमियम मध्ये कपात केली जाणार आहे. यामध्य ती वाहने सामिल होतील ज्यांचा पब्लिक सोबतच प्रायव्हेट कॅरियर्स मार्फत उपयोग केला जातो. 
-सहा हाॅसपाॅवरपर्यंच्या ट्रॅक्टर्स साठीच्या दरात किरकोळ वाढ केली जाईल. 

 

 

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ?


-मोटर वाहन कायद्यात थर्ड पार्टी प्रिमियमची तरतुद खूप आधीच केली गेली आहे. याला थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर या नावाने देखील ओळखले जाते. नावावरुनच हे स्पष्ट होते की तिस-या पक्षकाराशी संबंधित विमा आहे. जेव्हा वाहन दुर्घटना घडते तेव्हा कित्येक वेळा विमा करणारा आणि विमा कंपनी या शिवाय तिसरा घटक देखील असतो जो या दुर्घटनेमुळे बाधित होतो. त्यामुळे ही तरतुद तिस-या पार्टीच्या जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी केली केली आहे. 

 


आणखी पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....

 

बातम्या आणखी आहेत...