आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रा लोनमुळे बदलले नशीब, एका वर्षात 75 लाखाचा व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या मु्द्रा योजनेमुळे तारकेश्वरी यांचे नशीबच बदलले. त्यांना मुद्रा योजनेतंर्गत 5 लाखाचे कर्ज मिळाले होते. या कर्जाद्वारे त्यांनी एका वर्षात 75 लाखाचा व्यवसाय केला. त्यांचा व्यवसाय आता वाढतच चालला आहे. एक काळ असा होता जेव्हा तारकेश्वरी यांना आपला छोटा व्यवसाय चालविणे जिकरीचे झाले होते. विशेषत: एक ऑर्डर पुर्ण करणेही त्यांना कठीण जात होते. पण मुद्रा योजनेमुळे त्यांना केवळ कर्जच मिळाले नाही तर स्वत:ची एक ओळखही मिळाली. आम्ही तुमच्या तारकेश्वरी यांची हिच यशोगाथा सांगत आहोत.

 

 

काय करतात तारकेश्वरी
तारकेश्वरी, हैदराबाद येथे स्वत:चे बुटीक चालवितात. त्याचे नाव तारास स्टायलिंग बुटीक असे आहे. त्या ड्रेस मटेरियलच्या डिझाईनचा आणि साडीचा व्यवसाय करतात. त्यांचे ग्राहक हे मुख्यत: अनिवासी भारतीय आहेत. त्याच्याकडे 5 जण स्टिचिंग वर्क, मैगेम वर्क, डाइंग असे काम करतात. चांगल्या डिझाईनमुळे या प्रोडक्टला चांगली मागणी आहे.

 

 

का पडली कर्जाची गरज
- तारकेश्वरी यांचे डिझाईन्स लोकांच्या इतक्या पसंतीस उतरले की त्यांना बल्कमध्ये ऑर्डर येऊ लागल्या. पण जागेची आणि खेळत्या भांडवलाची कमतरता असल्याने त्या लोकांची मागणी पूर्ण करु शकत नव्हत्या. त्याचवेळी त्यांना समजले की केंद्र सरकारने मुद्रा योजनेची सुरुवात केली आहे. त्यांनी आंध्रा बँकेत मुद्रा लोनसाठी अर्ज केला.

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...