आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी यांच्या या वादळात उडाले बिर्ला, बुडाले 10 हजार कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य बिर्ला ग्रुपला आणि आयडियाला बाजारात मोठा धक्का बसला आहे. - Divya Marathi
आदित्य बिर्ला ग्रुपला आणि आयडियाला बाजारात मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम मार्केटचे सगळे गणित बदलले. अनेक लहान कंपन्या बाजारातून गायब झाल्या तर अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. तर काहींना विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारावा लागला. जिओचा प्रभाव इतका होता की आदित्य बिर्ला यांच्या आयडियालाही याची मोठी किंमत चुकवावी लागली. आयडियाचे बाजारमुल्य त्यामुळे वर्ष 2018 मध्ये 10 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. सध्या आयडिया आणि व्होडाफोन हे विलीनीकरणाच्या प्रक्रियेतुन जात आहेत.

 

 

52 आठवड्यातील कमीत कमी मुल्यांवर आयडियाचा स्टॉक
- या आठवड्यात गुरुवारी आयडियाचा स्टॉक 70 रुपयांसोबत 52 आठवड्यातील कमीत कमी मुल्यावर पोहचला. व्होडाफोनसोबतच्या विलीनीकरणास उशीर होत असल्याने आयडियाच्या स्टॉकवर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. सध्या स्टॉक 20 जानेवारी 2017 च्या लो लेव्हलवर ट्रेड करत आहे. या वर्षात आयडियाच्या स्टॉक मुल्य जवळपास 35 टक्क्याने घटले आहे.

 

 

पुढे वाचा: अजुन मिळालेली नाही एफडीआयची मंजुरी

बातम्या आणखी आहेत...