आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी ईशानेच दिली होती Jio ची आयडिया, मुकेश अंबानी यांनी केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानी यांनी सांगितले टेलीकाॅम बिझनेसमध्ये उतरण्याचे कारण. - Divya Marathi
मुकेश अंबानी यांनी सांगितले टेलीकाॅम बिझनेसमध्ये उतरण्याचे कारण.

नवी दि‍ल्‍ली- रिलायंस इंडस्ट्रीज (आरआयएल) चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी टेलीकाॅम क्षेत्रात उतरण्याबद्ल एक कार्यक्रमात खुलासा केला आहेच त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी ईशाला निर्माण झालेल्या एका अडचणीमुळे त्यांना जिओची आयडिया मिळाला आणि त्यांनी टेलीकाॅम बिझनेसमध्ये पाऊल ठेवले. अंबानी यांनी फायनांशियल टाईम्स अर्सेलर मित्तल द्वारे लंडन मध्ये आयोजित 'ड्रायवर्स आॅफ चेंज अवाॅर्ड' कार्यक्रमात हा खुलासा केला. यावेळी अंबानी यांना सन्मानित करण्यात आले. 

 

जेव्हा ईशा म्हणाली फारच कमी आहे इंटरनेटचा स्पीड
 भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि देशामधील टेलीकाॅम मार्केटमध्ये नवील लढाई सुरु करणारे मुकेश अंबानी यांनी 2011मधील त्या आठवणी सांगितल्या, त्यांची मुलगी ईशा अंबानी अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती आणि ती भारतात आली होती. ईशाला आपलं एक कोर्सवर्क सबमिट करायचं होते, पण काम करताना इंटरनेटची गति खुपच कमी असल्याने तिला अडचण येत होती. ईशाने आपले वडील मुकेश अंबानी यांना याबद्दल सांगितले आणि येथेच ख-या अर्थाने जिओच्या पर्दापणाची सुरवात झाली. 


मुलाने सांगितले डिजीटलमध्येच आहे भविष्य 

मुकेश अंबानी यांनी सांगितले, इंटरनेटच्या गतीची अडचण लक्षात आल्यानंतर मुलगा आकाशने त्यांना सांगितले की टेलीकाॅम कंपन्या आज फक्त काॅल्सच्या माध्यमातून पैसे कमवित आहेत, पण येणार काळ हा डिजीटल असेल आणि सगळी कामं डिजीटली केली जातील. यानंतर आकाश ने आपल्या वडिलांना टेलीकाॅम इंडस्ट्रीत पर्दापण करण्यास प्रोत्साहित केले. 

 

बातम्या आणखी आहेत...