आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना Jio मुळे फॉर्च्यून मॅगझिनच्या टॉप-50 ग्रेटेस्ट लीडर्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या इंदिरा जयसिंह आणि आर्किटेक्ट बालकृष्ण दोशी यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत जगभरात बदल घडविणाऱ्या नामांकित व्यक्तींना सामील केले जाते. यावर्षी अॅपलचे सीईओ टिम कुक, न्युझीलॅंडचे पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न आणि फुटबॉल कोच निक सबन यांना यादीत स्थान देण्यात आले आहे.
Jio च्या यशाने अंबानींना यादीत स्थान
- अंबानी यांच्या जन्मदिनी रिलीज करण्यात आलेल्या या यादीत त्यांना 24 वे स्थान मिळाले आहे. फॉर्च्यूननुसार, मागील दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत अंबानींनी jio च्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरात लाखो भारतीयांच्या हातात इंटरनेट आणि मोबाईल डेटा पोहचवला. यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धकांना आपल्या किंमती कमी कराव्या लागल्या. भारतात डेटाचा वापर यामुळे 1100 टक्क्यांनी वाढला.
2016 मध्ये लॉन्च झाला होता Jio
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये Jio लॉन्च केले. याच्या यशाचा अंदाज याच बाबीने लावता येतो की कंपनीने आता जवळपास 16 कोटी ग्राहक जोडले आहेत.
पुढे वाचा: लिस्टमध्ये अंबानीच्या पुढे इंदिरांना स्थान
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.