आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉनविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई; NCLT कंपनीविरुद्ध SBI याचिका स्वीकारली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजविरुद्ध दिवाळीखाेरीची कारवाई करण्यात येणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मुंबई पीठाने बुधवारी दिवाळखाेरी वा नादारी कायद्यांतर्गत कंपनीविरुद्ध याचिका स्वीकारली. एसबीआयने जानेवारीत दिवाळखाेरीची याचिका दाखल केली होती. लवादाने केपीएमजीच्या अनुज जैन यांना अंतरिम रिझोल्युशन प्राेफेशनल नियुक्तीस मंजुरी दिली आहे. दिवाळखोरीची प्रक्रिया त्यांच्याच देखरेखीखाली होईल.

 

रिझर्व्ह बँकेने कारवाई करण्यासाठी निर्देश जारीकेलेल्या कंपन्यांच्या दुसऱ्या यादीत व्हिडिओकॉनचे नाव होते. व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी सांगितले की, कंपनी दिवाळखोरीच्या याचिकेविरुद्ध आव्हान देणार नाही. काही बँका आमच्या प्रस्तावावर राजी आहेत. त्यानुसार तेलाच्या व्यवसायातून येणारे पैसे बँकांना मिळतील. आम्ही पूर्ण पैसे परत करू, काही बँका दिवाळखोरीच्या कारवाईतून बाहेर होतील, अशी आशा आहे. बहुतांश बँका एनसीएलटीमध्ये जाण्याविरुद्ध असल्याचा दावाही त्यांनी केला. 

 

कंपनीवर 44 हजार कोटींचे कर्ज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने दिवाळखोरीच्या उबरठ्यावर असलेल्या कंपन्याच्या यादीत व्हिडीओकॉनला सामील करण्यात आल्यानंतर देणकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे एकुण कर्ज 44,000 कोटी रुपये आहे. देणकऱ्यांनी अद्याप व्हिडीओकॉनच्या परदेशी युनिटला कोर्टात खेचलेले नाही. याचे कारण ते अजुनही कर्जफेड करत आहेत तर व्हिडीओकॉनचे अर्धे कर्ज हे त्यांच्या परदेशी युनिटचे आहे.

 

कंपनीवर १९,५०० कोटींचे कर्ज

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजला २७ बँकांनी कर्ज दिलेले आहे. मार्च २०१७ मध्ये कंपनीवर बँकांची १९,५०६ कोटींची थकबाकी आहे. समूहाच्या सर्व कंपन्यांवर ४४ हजार कोटींचे कर्ज आहे. तेलाच्या व्यवसायातील तोट्यामुळे कंपनी संकटात आली. कंपनीने काही मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून फारसा फायदा झाला नाही. 

 

चेअरमन धूतविरुद्ध सुरू आहे सीबीआय चौकशी
व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एमडी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्याशी ती निगडित आहे. आरोपांनुसार, धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपनीत पैसे गुंतवले. यानंतर आयसीआयसीआयने कंपनीला कर्ज दिले. सेबीही चंदा यांच्याविरुद्ध दुहेरी हिसंबंधांची चौकशी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...