आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारुती सुझुकीची नवी अर्टिगा, या बदलासह लवकरच येणार बाजारात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नव्या मारुती सुझुकी एमपीवीवरुन अखेर पडदा हटला आहे. नव्या अर्टिगाचा ग्लोबल डेब्यू इंडोनेशियाच्या इंटरनॅशनल मोटर शो 2018 मध्ये करण्यात आला आहे. नव्या मारुती अर्टिगाचे ब्रॅंन्ड न्यू डिझाईन अतिशय आकर्षक आहे. याशिवाय साईजही वाढविण्यात आली असून तिला अधिक पॉवरफुल करण्यात आले आहे.

 


नव्या अर्टि‍गाच्या सुझुकीला HEARTECT प्‍लेटफॉर्मवर बनविण्यात आले आहे. यापूर्वी स्वीफ्ट, डिझायर, बलेनो आणि इग्निसला या प्‍लेटफॉर्मवर बनविण्यात आले आहे. हे अर्टि‍गाचे सेकंड जनरेशन आहे. ते लवकरच भारतात लॉन्च करण्यात येईल. 

 


काय आहे बदल
नव्या मारुती सुझुकी अर्टि‍गाच्या नव्या हेक्‍सागन ग्रि‍लवर क्रोमचा लुक देण्यात आला आहे. एंजुलर हेडलॅम्‍पसोबत प्रोजेक्‍टर लेंस देण्यात आली आहे. फ्रंट बंपरही नवे असून त्यात सी-शेपवाले फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. नवा बोनेटही जास्त स्ट्रॉग करण्यात आला आहे.

अर्टि‍गाचा रीयर पाहिल्यास डब्‍ल्‍यूआर-वी सारखा दिसेल. कारण याचे टेल लॅम्प एल-शेपमध्ये आहेत. यातही एलईडी लॅम्प आहेत. याशिवाय लायसन्स प्लेटमध्येही क्रोमचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय रीयर बंपरचे डिझाईनही बदलण्यात आले आहे. याचा इतका मजबूत लूक याच्या 15 इंच 185/R65 अलॉय व्‍हील्‍समुळे सुध्दा आहे. 

 

 

अर्टि‍गाला मिळाले नवे इंजिन
नव्या अर्टिंगात नवे 1.5 लीटर K15B, DOHC, VVT पेट्रोल इंजिन आहे. ते मॅक्झिमम 104 एचपी पॉवर आणि 138 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय 5 स्‍पीड मॅन्युअल ट्रान्समि‍शन आणि 4 स्‍पीड टॉर्क कन्‍वर्टर ऑटोमॅटि‍क गि‍अरबॉक्‍स आहे. भारतात याला समान इंजिनासोबत सादर केले जाणार आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये 1.4 लीटर इंजिन आहे.

 

 

पुढे वाचा: मारुती सुझुकी अर्टि‍गात आणखी काय आहे खास...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...