आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीदरम्यानच्या या चुकांमुळे खावी लागेल जेलची हवा, सरकारने दिली शेवटची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोटबंदी दरम्यान जर तुम्ही काही चुका केल्या असतील त्या सुधारण्यासाठी सरकारने आणखी एख संधी दिली आहे. देशात अजून असे अनेक लोक आहेत ज्यांनी नोटबंदी दरम्यान आपल्या बॅंक खात्यांमध्ये हिशोबापेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत आणि 31 मार्च 2017 नंतर इनकम टॅक्स रिटर्न देखील भरलेला नाही. हे लोक 31 मार्च आधी रिटर्न फाईल करुन आपली चूक सुधारु शकतात. असे न करणा-यांविरुद्ध सरकार 31 मार्चनंतर कडक पावले उचलू शकते. यामुळे फार मोठा दंड भरावा लागेल किंवा जेलची हवा देखील खावी लागेल. 


नोटीस नाही मिळाली तर बचावल्याचा गैरसमज करु नका 
सीए आणि टॅक्स सल्लागार पवनकुमार जायसवाल यांनी सांगितले की सरकार बॅंक खात्यात जमा पैशांशिवाय अनेक प्रकारची माहिती गोळा कत असते. म्हणून जर तुम्हाला असे वाटत असेल की इनकम टॅक्स विभागाची नोटीस मिळाली नाही म्हणजे तुम्ही कारवाईपासून वाचला तर तो तुमचा गैरसमज आहे. सरकार 31 मार्च नंतर नोटबंदी दरम्यान एकत्र केलेल्या माहितीच्या आधारे वेगाने कारवाई करु शकते.  


कशा प्रकारे गोळा होतो डाटा 
-सरकार बॅंकामधील ठेवीवर नजर ठेवून आहे. नोटबंदी दरम्यान ज्या लोकांनी कंपन्यांच्या बॅंक अकाउंमध्ये मर्यादेपेक्षा जास्त देवाणघेवाण केली आणि रिटर्न फाइल केला नाही तर किंवा त्या डाटानुसार हिशोब योग्य नसेल तर त्यावर कारवाई होईल. 
-जर एखाद्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असेल तर त्याला देखील कारवाईचा सामना करावा लागेल. अशा खरेदीचे रेकाॅर्ड अनेक ठिकाणी असते. जायसवाल यांच्या म्हणण्यानुसार लोकांना वाटत असेल की त्यांनी महागडे सामान मोठे वाहन खरेदी केल्यामुळे कारवाई पासून बचावले पण तो त्यांचा गैरसमज आहे. सामान, गाडया विकल्यानंतर त्याचा हिशोब विकणा-या लोकांना देखील जमा करावा लागतो, सरकार अशा स्त्रोतांची माहिती देखील गोळा करते. हेच जमीन किंवा संपत्तीच्या व्यवहारांच्या बाबतीत लागू होते. 


पुढे वाचा काय होऊ शकते कारवाई ?