आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतबल झाले मुकेश अंबानी, इच्छा असून देखील करु शकले नाही भावाला मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे हतबल झाले मुकेश अंबानी (फाइल फोटो) - Divya Marathi
असे हतबल झाले मुकेश अंबानी (फाइल फोटो)

नवी दिल्ली. अनिल अंबानी यांना मोठा झटका बसला आहे, ज्यानंतर समोर आलं आहे की त्यांचे मोठे बंधू आणि देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी इच्छा असून देखील त्यांना मदत करु शकत नाहीत. याचं कारण आहे बाॅम्बे हायकोर्टाने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायंस कम्युनिकेशन्स (आरकाॅम) च्या विरोधात दिलेला निर्णय. आरकाॅम यानंतर आपले कोणतेही अॅसेट कोर्टाच्या परवानगी शिवाय विकू शकणार नाही. आरकाॅम कर्जात बुडाली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने मुकेश अंबानी यांच्या जिओशी आपले अॅसेट्स विकण्यासाठी मोठी डील केली होती. 

 


आरकाॅम वर आहे 45 हजार कोटींच कर्ज 

 

आरकाॅम वर 45 हजार कोटींच (मार्च 2017) कर्ज आहे. लेंडर्सच्या दबावामुळे अनिल अंबानी यांनी डिसेंबर 2017 मध्य कर्ज फेडण्यासाठी एक प्लॅन सादर केला होता. यामध्ये त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी मोठी मदद देऊ केली होती. अनिल अंबानी यांनी मोठे बंधू मुकेश यांच्या जिओ कंपनी सोबत हजारो करोड रुपयांची डीलची घोषणा केली होती. यानुसार आरकाॅमचे अॅसेट्स विकण्याचा प्रस्ताव होता. पण कोर्टाच्या आदेशामुळे मुकेश अंबानी देखील हतबल झाले आणि अनिल अंबानींच्या देखील अडचणी वाढल्या. 

 


स्वीडनच्या कंपनीने दाखल केली होती याचिका 

 

स्वीडनची कंपनी इरिक्सनच्या भारतीय सब्सिडियरीने आरकाॅमच्या देशभरातील नेटवर्कला आॅपरेट आणि व्यवस्थापनासाठी सात वर्षांचा करार केला होता. या कराराअंतर्गत कंपनीची आरकाॅम कडे 1155 करोड रुपयांची बाकी आहे. यामुळे कंपनीने सप्टेंबर 2017 मध्ये आरकाॅमच्या विरोधात इनसाॅल्व्हंसी पिटीशन दाखल केली होती आणि बाकी रकम मिळण्याची विनंती केली होती. आॅर्बिट्रेशन कोर्टाने या याचिकेनंतर आरकाॅमला मोठा झटका दिला आणि आरकाॅम व तिच्य़ा अन्य दोन कंपन्यांचे अॅसेट मंजूरी शिवाय विकण्याचा प्रतिंबंध लावला. 

 

 

पुढे आणखी वाचा 

बातम्या आणखी आहेत...