नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडिया थर्ड जनरेशन स्विफ्ट लाँच झाल्यानंतर नवीन रेकाॅर्ड करत आहे. 10 सप्ताहांपूर्वी मार्केट मध्ये लाँच झालेल्या स्विफ्टची टोटल बुकिंग 1 लाख युनिट्सवर पोहचली आहे. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला एक स्विफ्ट बुक होत आहे हे एक आपलेच रेकाॅर्ड मोडल्यासारखे आहे. या रेकाॅर्डने फक्त दुस-या कंपन्यांना टक्कर दिलेली नाही तर विक्रीच्या बाबतीत स्विफ्ट आपल्या कंपनीच्या दुस-या ब्रॅंडसच्या पुढे निघून गेली आहे. नवीन स्विफ्टने या आकड्यांसोबतच कंपनीच्या बेस्ट सेलिंग कार डिझायर आणि बलेनोला देखील मागे टाकले आहे.
3 ते 4 महिन्यांची वेटिंग
मागील महिन्यात आॅटो एक्सपोमध्ये लाॅंच झालेली स्विफ्टचे व्हेरिएंट्ससाठी वेटिंग पिरियड आधीच 3 ते 4 महिन्यांपर्यंत पोहचला आहे. मारुती सुझुकीचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग अॅंड सेल्स) आर. एस. कलसी यांनी सांगितले की आमचे काही बेस्ट सेलर्स जसे की डिझायर आणि बलेनो ने चांगल परफाॅर्मंस दिला आहे पण त्यांनी देखील 1 लाख बुकिंगचा आकडा इतक्या कमी कालावधीत गाठलेला नाही.
टाॅप व्हेरिएंटचे 33 टक्के बुकिंग
पहिल्यांदा कार खरेदी करण्यासाठी स्विफ्टच्या टाॅप व्हेरिएंटचे 33 टक्के माॅडेल्सचे बुकिंग केले आहे. हे माॅडेल आॅटो गिअर शिफ्ट टेक्नाॅलाॅजीचे सुविधा देते. कंपनीने म्हटले आहे की आजच्या जमान्यात कार चालवणा-यांची सगळ्यात मोठी चिंता दूर झाली आहे. नवी स्विफ्ट उत्तर एक्सलरेशन, फरफाॅर्मेंस, जास्त जागा आणि जास्त कंम्फर्टेबल ड्रायव्हिंगचा अनुभव देते.
स्विफ्टची प्रत्येक जनरेशन आहे पाॅप्युलर
स्विफ्ट |
पिरिअड |
सेल्स यूनिट्स |
पहिली जेनरेशन |
मे 2005- जून 2011 |
606,004 |
दुसरी जेनरेशन |
जुलै 2011-डिसेंबर 2017 |
1,192,069 |
तिसरी जेनरेशन |
जानेवारी 2018 (फेब्रुवारीपर्यंत) |
31,736 |