आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींसमोर उघडले नाही तोंड, आपल्या देशात पोहचल्यावर मात्र केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओपेकच्या निर्णयामुळे जगभरात तेलाच्या किंमती वाढत आहेत. - Divya Marathi
ओपेकच्या निर्णयामुळे जगभरात तेलाच्या किंमती वाढत आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा दिवसापूर्वी दिल्लीत एका बैठकीत तेल उत्पादक देशांना (OPEC) आवाहन केले होते की त्यांनी तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवावे. या बैठकीत युएई, सौदी समवेत अनेक ओपेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी या देशांनी मोदींच्या मताशी सहमती दर्शवली मात्र आपआपल्या देशात पोहचल्यावर मात्र त्यांनी तेलाचा खेळ पुन्हा सुरु केला. भारतात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती उच्च पातळीवर असल्याने सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत.

 

 

बंद खोलीत झाली बैठक
यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश असणाऱ्या सौदी अरबने जेद्दा येथे एक बैठक बोलावली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीत अन्य देशांसमवेत रशियाही सामील झाला होता. या बैठकीत तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर जगभरात तेलाच्या पदार्थांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. कच्चे तेलाच्या किंमती यावेळी 73 डॉलर प्रती बॅरलवर पोहचल्या आहेत. ही किंमत 2016 मध्ये 29 डॉलरवर पोहचली. किंमती घसरत असल्याने ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन घटवले. त्यानंतर आता तेलाच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

 


भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्च स्तरावर
- या सगळ्या घडामोडींचा प्रभाव भारतीय बाजारावर पडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्च स्तरावर आहेत. यावेळी पेट्रोलच्या किंमती काही शहरात 83 रुपयावर पोहचल्या आहेत. तर पहिल्यादाच डिझेल 70 रुपयांवर गेले आहे. 

 

 

पुढे वाचा: मोदींचे म्हणणे ऐकले नाही... 

बातम्या आणखी आहेत...