आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन गेमिंगच्या विस्तारामुळे डेव्हलपर्ससाठी राेजगाराच्या संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफाेनच्या विस्ताराने माेबाइल गेम्समध्ये वाढ झाल्याचे दिसून अालेय. हायस्पीड इंटरनेटमुळे अागामी काळात अाॅनलाइन गेम खेळणाऱ्यांची संख्या वेगाने वाढणार अाहे. २०२१पर्यंत अाॅनलाइन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत १९ काेटींची वाढ हाेईल. बाजारपेठेतही तिपटीहून अधिक वाढ हाेऊ शकते. त्यामुळे राेजगाराच्या संधी वाढतील.


जगभरात व्हिडिअाे गेमिंगची लाेकप्रियता वाढत अाहे. याचा अाशियाई खेळांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यामुळे हा खेळ अाॅलिम्पिकमध्ये दिसू शकताे. याबाबत भारतही मागे नाही. भारतातही तरुणांत व्हिडिअाे गेम्सची अावड वाढतेय. स्मार्टफाेन्सने या उद्याेगाला असे व्यासपीठ दिले, ज्यामुळे गेमिंगचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत झालाय. प्ले स्टाेअरवरील अनेक गेमिंग अॅप्स सहज डाऊनलाेड हाेतात. अागामी काळात या उद्याेगाचा अधिक विस्तार हाेऊन राेजगाराच्या नवीन संधी निर्माण हाेतील. 


केपीएमजीच्या अहवालानुसार देशातील अाॅनलाइन गेमिंग उद्याेग २०१६मध्ये सुमारे २९ काेटी डाॅलर्सचा हाेता. २०२१पर्यंत या उद्याेगाशी १९ काेटी नवे अाॅनलाइन गेम खेळणारे जुळतील व हा उद्याेग तिपटीहून अधिक वाढून एक अब्ज डाॅलर्सचा हाेऊ शकताे. अहवालानुसार हा उद्याेग वार्षिक २८ % दराने वाढताेय. हा उद्याेग वाढण्याचे एक माेठे कारण हे अाहे की, अाॅनलाइन गेमिंगमधील ५० %हून अधिक वापरकर्ते २४ वर्षांहून कमी वयाचे अाहेत व येणाऱ्या काळात यात वाढ हाेऊ शकते. स्मार्टफाेनच्या गेमिंग उद्याेगातील भूमिकेवरून याचा अंदाज यावरून लावता येताे की, ७५ % गेमिंगची बाजारपेठ मिड रेंज स्मार्टफाेनवर अाधारित अाहे. हायस्पीड इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या याच्या विस्तारास सहायक ठरेल. त्यानंतर व्हर्च्युअल गेमिंगसाठी उत्पादनांच्या उपलब्धतेत वाढ हाेईल, जी वापरकर्त्यांना एक नवा अनुभव देईल. परिणामी, गेमिंग उद्याेगात कुशल गेम डेव्हलपर्सची मागणी वाढेल. 


संगणक विज्ञान अभ्यासक्रम करून यात करा करिअर
गेमिंग डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात काेणताही पूर्वेतिहास असलेले विद्यार्थी करिअर करू शकतात. तथापि, पदवीच्या स्तरावर याचे स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम संचालित केले जात नाहीत; परंतु काॅम्प्युटर प्राेग्रामिंगची माहिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र करिअरचा चांगला पर्याय अाहे. यासाठी विद्यार्थी संगणक विज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तसेच संगणक अभियांत्रिकीच्या बी.ई. वा बी.टेक. करणारेही यात करिअर करू शकतात. संगणक अभियांत्रिकीच्या पदवीला जेईईच्या गुणांच्या अाधारे प्रवेश मिळताे, तर संगणक विज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमास संस्थेतर्फे अायाेजित प्रवेश परीक्षेच्या गुणांवर प्रवेश मिळताे. त्यानंतर गेमिंग डेव्हलपमेंटच्या डिप्लाेमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विशेषता प्राप्त केली जाऊ शकते. गेम डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १२वीनंतरच अॅनिमेशनच्या डिप्लाेमालाही प्रवेश घेऊ शकतात. डिझायनिंगमध्ये यासाठीच्या विविध टूल्सची माहिती असणे गरजेचे असते. यात गेमिंग कॅरेक्टर्स व मूव्हमेंटची डिझाइन करणे अादी काम असते.


विविध कार्यक्षेत्रांत असतात राेजगाराच्या संधी
गेमिंग उद्याेगात राेजगाराच्या सर्वाधिक संधी प्राेग्रामिंग, डेव्हलपमेंट व डिझायनिंगमध्ये अाहेत. अावश्यक पदवी मिळवल्यानंतर अॅनिमेटर, स्केचर, मुव्ही मेकर, साॅफ्टेवेअर डेव्हलपर, गेम टेस्टर, साउंड इंजिनिअर, गेम अार्टिस्ट, गेम डिझायनर अादी पदांवर नाेकरी करू शकतात. मल्टिमीडिया संस्था, प्राॅडक्शन हाऊस, जाहिरात संस्था अादींमध्ये दरवर्षी माेठ्या संख्येत प्रशिक्षित व्यावसायिकांना नियुक्त केले जाते. याशिवाय विद्यार्थी फ्री-लान्सिंगही करू शकतात. देशातच नव्हे, तर विदेशातही राेजगाराच्या संधी असतात.


प्रारंभी तीन ते चार लाख रुपये वार्षिक पॅकेज
कमाईच्या दृष्टीने गेमिंग व अॅनिमेशन हे उत्कृष्ट पर्यायांपैकी एक अाहे. गेमिंग व्यावसायिकांना प्रारंभी तीन ते चार लाखांचे वार्षिक वेतन पॅकेज मिळू शकते. एक-दाेन वर्षांच्या अनुभवानंतर ते दुपटीहूनही वाढू शकते. अॅनिमेशन व्यावसायिकांना  २.५ ते चार लाखांचे वार्षिक वेतन मिळते. माेठे प्राॅडक्शन हाऊस व मल्टिमीडिया संस्थांमध्ये अधिक पॅकेज मिळते. विदेशातही संधी असतात. विकसित देशांत प्रशिक्षित व्यावसायिकांना २० ते ३० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...