आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- गोल्ड लोनचा कारभार करणाऱ्या इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेड (IIFL) या कंपनीने गहाण पडलेले सोने लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांनी सोने गहाण ठेवत कर्ज घेतले पण ते हे कर्ज फेडू शकले नाहीत. अशा लोकांचे सोने कंपनी लिलावात काढणार आहे. कंपनी तीन राज्यांमध्ये अशा पध्दतीचा लिलाव करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सोने कमी किंमतीत मिळू शकते. तु्म्ही हे सोन्याचे दागिने लिलावात खरेदी करण्यापूर्वी पाहू सुध्दा शकता. तु्म्हाला दागिने पसंत आल्यावर तुम्हाला लिलावात भाग घेण्याची औपचारिकता पुर्ण करावी लागेल.
कोणत्या राज्यात होणार लिलाव
कंपनी तीन राज्यात सोन्याच्या दागिण्यांचा लिलाव करणार आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानचा समावेश आहे. या राज्यातील अनेक शाखांमध्ये हा लिलाव होईल. कंपनीने याबाबतची माहिती आपल्या संकेतस्थळावर टाकली आहे. ती तुम्ही पाहू शकता.
उत्तर प्रदेश: कंपनीने आपल्या जाहिरातीत माहिती दिली आहे की, आग्रा येथील अनेक शाखांमध्ये गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याची विक्री करण्यात येणार आहे. हा लिलाव 26 एप्रिल 2018 रोजी करण्यात येईल. कंपनीच्या या लिलावात जैसे आहे त्या स्वरुपात सोन्याची विक्री करण्यात येणार आहे. कोणाला हे सोने पाहायचे असल्यास ते 25 एप्रिलपर्यंत हे सोने पाहू शकतात. कंपनीबाबत माहितीसाठी एक मोबाईल नंबरही जारी केला आहे.
Mobile No - 9414812118
राजस्थान: कंपनी राजस्थानात लिलाव
करत असून 24 एप्रिल 2018 रोजी
हा लिलाव होणार आहे. तुम्हाला हे दागिने पाहायचे असल्यास तुम्ही ते 23 एप्रिलपर्यंत पाहू शकता. याबाबत माहितीसाठी खालील मोबाईल नंबर जारी करण्यात आला आहे.
Mobile No - 9414812118
हरियाणा: कंपनी हरियाणात गहाण ठेवण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव करणार आहे. हा लिलाव 26 एप्रिल 2018 रोजी होणार आहे. कोणाला लिलावापूर्वी हे दागिने पाहायचे असल्यास 25 एप्रिलपुर्वी शाखेशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
Mobile No - 9467285828
पुढे वाचा : सगळ्यांसाठी आहे संधी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.